पी. व्ही. सिंधूला दुखापतीमुळे मोठा धक्का, कॉमनवेल्थची चॅम्पियन सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून बाहेर

कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये भारताची (India) स्टार बॅडमिंटनपटू (badminton player) पी. व्ही. सिंधू (P V sindhu)हिने देशासाठी गोल्ड मेडल (Gold Medal) जिंकले. सिंधूने पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG) महिला सिंगल्समध्ये गोल्ड मेडल मिळवले. मात्र गोल्ड मेडल जिंकण्याच्या प्रयत्नासाठी सिंधूने दुखापत असतानाही फायनल मॅच खेळली.

Commonwealth champion Sindhu out of World Championship
कॉमनवेल्थची चॅम्पियन सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून बाहेर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कॉमनवेल्थ गेम्सच्या फायनलमध्ये सिंधूच्या पायाला इजा झाली होती.
  • दुखापतीचा त्रास होत असल्याने वर्ल्ड चॅम्पियनशीप खेळू शकणार नसल्याचे पत्रक पी.व्ही सिंधूने प्रसिद्ध केले आहे.

नवी दिल्ली:  कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये भारताची (India) स्टार बॅडमिंटनपटू (badminton player) पी. व्ही. सिंधू (P V sindhu)हिने देशासाठी गोल्ड मेडल (Gold Medal) जिंकले. सिंधूने पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG) महिला सिंगल्समध्ये गोल्ड मेडल मिळवले. मात्र गोल्ड मेडल जिंकण्याच्या प्रयत्नासाठी सिंधूने दुखापत असतानाही फायनल मॅच खेळली. आता तीच दुखापत गंभीर झाली आहे. या कारणामुळे या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या स्पर्धेत (World championship tournament)ती खेळू शकणार नाही.  

जपानच्या टोकियो शहरात 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत BWF वर्ल्ड चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. यात माजी महिला सिंगल्स चॅम्पियन पी व्ही सिंधू दुखापतीमुळे सहभागी होऊ शकणार नाहीये. दरम्यान, कॉमनवेल्थ गेम्सच्या फायनलमध्ये सिंधूच्या पायाला इजा झाली होती. सामना जिंकून परत हैदराबादमध्ये आल्यानंतर तिने एमआरआय केला. त्यात तिच्या डाव्या पायाला स्ट्रेस फॅक्टर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Also : उद्धव ठाकरेंच्या त्या प्रश्नाला भाजपाकडून सणसणीत प्रत्युत्तर

या दुखापतीचा त्रास होत असल्याने वर्ल्ड चॅम्पियनशीप खेळू शकणार नसल्याचे पत्रक तिने प्रसिद्ध केले आहे. डॉक्टरांनी काही आठवडे विश्रांतीला सल्ला दिल्याचा उल्लेखही तिने यात केला आहे. काही काळानंतर पुन्हा ट्रेनिंग सुरू करेन, असेही तिने लिहिलेले आहे.

दुखापत असतानाही देशासाठी खेळली

या महिन्यात जपानच्या टोकियो शहरात 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत BWF वर्ल्ड चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. यात माजी महिला सिंगल्स चॅम्पियन पी.व्ही. सिंधू ही सहभागी होऊ शकणार नाहीये. सिंधूला नुकत्याच झालेल्या क़ॉमनवेल्थ गेम्समध्ये दुखापतीचा सामना करवा लागला आहे. महिला सिंगल्सच्या सेमीफायनलचया मॅचमध्ये सिंधूला दुखापत झाली होती. दुखापत झालेली असतानाही मोठा संघर्ष करत तिने हा सामना जिंकला होता. इतकेच नाही तर 8 ऑगस्टला झालेल्या फायनलमध्येही दुखापत असतानाही खेळत तिने देशासाठी गोल्ड मेडल जिंकले होते. दुखापतीचा त्रास सहन करत तिने ही मॅच खेळली होती. आता मात्र याच दुखापतीमुळे ती वर्ल्ड चॅम्पियनशीपला मुकणार आहे.

Read Also : भाजपच्या तिरंगा यात्रेत उर्दू शाळेच्या विद्यार्थीनींचा सहभाग

अनेक भारतीय खेळाडूंचे प्रेरणास्थान

दोन ऑलिपिंक पदके जिंकणारी आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये  बॅडमिंटनमध्ये गोल्ड मेडल मिळवणारी पी.व्ही. सिंधू ही पहिली भारतीय महिला प्लेयर ठरलेली आहे. पी.व्ही. सिंधू हिचे आई वडीलही आंध्र प्रदेशातून राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत. ते वॉलिबॉल प्लेअर्स होते. त्यांच्यामुळे तिच्या जगण्यात क्रीडा प्रकारांनी महत्त्वाचे स्थान निर्माण केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी