CWG 2022: भारताच्या पी.व्ही सिंधूने रचला इतिहास, पटकावले गोल्ड मेडल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 08, 2022 | 15:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल पटकावले आहे.

pv sindhu
CWG 2022: भारताच्या पी.व्ही सिंधूला गोल्ड मेडल 
थोडं पण कामाचं
  • अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने महिला सिंगल्समध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे
  • तिने बॅडमिंटनच्या फायनलमध्ये कॅनडाच्या मिचेल लीला 21-15, 21-13 असे हरवले.
  • या पदकासोबतच सिंधूने आतापर्यंत कॉमनवेल्थमध्ये तब्बल ५ पदके मिळवली आहे. 

मुंबई: कॉमनवेल्थ गेमच्या(commonwealth games 2022) शेवटच्या दिवशी भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने(indian badminton player pv sindhu) महिला सिंगल्समध्ये(women singles) गोल्ड मेडल मिळवले आहे. तिने बॅडमिंटनच्या फायनलमध्ये कॅनडाच्या मिचेल लीला 21-15, 21-13 असे सहज हरवत गोल्ड मेडलला(gold medal) गवसणी घातली. या पदकासोबतच सिंधूने आतापर्यंत कॉमनवेल्थमध्ये तब्बल ५ पदके मिळवली आहे. (pv sindhu won gold medals in badminton singles commonwealth games 2022)

अधिक वाचा - म्हणून भारतातील या राज्यांत साजरा होत नाही स्वातंत्र्य दिन

असा रंगला सामना

संपूर्ण सामन्यादरम्यान पीव्ही सिंधूचा जलवा पाहायला मिळाला. तिने कॅनडाच्या मिचेल लीला अजिबात वरचढ होऊ दिले नाही. तिने पहिला गेम २१-१५ असा आपल्या नावे केला. तर दुसरा गेम २१-१३ने जिंकला. सिंधूने संपूर्ण सामन्यादरम्यान आपली पकड मजबूत ठेवली होती. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने धमाकेदार खेळ दाखवला. आणि कॅनडाच्या खेळाडूचे अजिबात काही चालू दिले नाही. सिंधूने दुसरा गेम २१-१३ असा जिंकत गोल्ड मेडलला गवसणी घातली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने दाखवून दिले की ती इतकी मोठी खेळाडू का आहे. 

सिंधूची पदके

वयाच्या २७व्या वर्षी तिने मिळवलेली ही पदके पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल

ऑलिम्पिक - सिल्व्हर, ब्राँझ
वर्ल्ड चॅम्पियनशिप - १ गोल्ड, २ सिल्व्हर, २ ब्राँझ
एशियन गेम्स - १ सिल्व्हर, १ ब्राँ
साऊथ एशियन गेम्स - १ गोल्ड, १ सिल्व्हर
उबेर कप - २ ब्राँझ
कॉमनवेल्थ गेम्स - २ गोल्ड, २ सिल्व्हर, १ ब्राँझ

कॉमनवेल्थमधील पाचवे पदक

भारताच्या पीव्ही सिंधूने कॉमनवेल्थ स्पर्धेत मिळवलेले हे पाचवे पदक आहे. 

२०१४ ग्लासगो महिला एकेरीत ब्राँझ पदक
२०१८ गोल्ड कोस्ट महिला एकेरीत सिल्व्हर मेडल
२०१८ गोल्ड कोस्ट मिक्स टीम गोल्ड मेडल
२०२२ बर्मिंगहॅम मिक्स टीम सिल्व्हर मेडल
२०२२ बर्मिंगहॅम महिला एकेरीत गोल्ड मेडल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी