Quadrangular Series: इतिहासात प्रथमच होणार चतुर्भुज मालिका?, भारत-पाक, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड असणार आमनेसामने 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 04, 2022 | 15:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Quadrangular Series Cricket | पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आगामी बैठकीमध्ये भारतासहीत चार देशांची स्पर्धा ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्याची तयारी  दर्शवली आहे. मात्र भारतीय क्रिकेट बोर्ड या प्रस्तावाशी असमहत असेल अशी आशा वर्तवली जात आहे. आयसीसीच्या सध्याच्या नियमांनुसार एक क्रिकेट बोर्ड जास्तीत जास्त तीन देशांच्या स्पर्धांचे यजमानपद सांभाळू शकते.

 Quadrangular Series will be the first quadrangular series in history
इतिहासात प्रथमच होणार चतुर्भुज मालिका?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चतुर्भुज मालिका व्हावी अशी मागणी पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी केली.
  • आयसीसीच्या सध्याच्या नियमांनुसार एक क्रिकेट बोर्ड जास्तीत जास्त तीन देशांच्या स्पर्धांचे यजमानपद सांभाळू शकते.
  • भारत आणि पाकिस्तानमधील शेवटची मालिका २०१२ मध्ये झाली होती.

Quadrangular Series Cricket | नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (PCB) रमीझ राजा यांनी आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) आगामी बैठकीमध्ये भारतासहीत चार देशांची स्पर्धा ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्याची तयारी  दर्शवली आहे. मात्र भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) या प्रस्तावाशी असमहत असेल अशी आशा वर्तवली जात आहे. आयसीसीच्या सध्याच्या नियमांनुसार एक क्रिकेट बोर्ड जास्तीत जास्त तीन देशांच्या स्पर्धांचे यजमानपद सांभाळू शकते. कारण तीन देशांहून अधिक टूर्नामेंट भरवण्याचा अधिकार हा केवळ जागतिक संस्थेला आहे. (Quadrangular Series will be the first quadrangular series in history). 

अधिक वाचा : ग्रॅमी पुरस्कारासाठी युक्रेनच्या राष्ट्रपतींची हजेरी

PCB ने केली मागणी 

मात्र रमीझ राजा यांच्या श्वेतपत्रिकेनुसार, ही दरवर्षी स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते, ज्याद्वारे मीडिया अधिकार आणि इतर व्यावसायिक क्रियाकलापांमधून ७५ कोटी डॉलरचा संभावित महसूल मिळेल. चार देशांच्या या टी-२० सुपर लीग टूर्नामेंटच्या प्रस्तावामध्ये भारताला चार सहभागी देशांपैकी एक म्हणून स्थान देण्यात आले आहे. रमीझ यांनी १० एप्रिल रोजी होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्याची योजना केली आहे. या प्रस्तावानुसार भारत आणि पाकिस्तान याशिवाय या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ सहभागी होतील. लक्षणीय बाब म्हणजे आयसीसी कडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर दरवर्षीच्या स्पर्धेत आशियाई शेजारील देश टॉपच्या स्तरावर भिडतील. 

अधिक वाचा : संगीतकार रिकी केजने भारतीयांसाठी दिली खुशखबर

BCCI अद्याप असहमत 

या पत्रानुसार चार संघामधून रोटेशनच्या आधारे स्पर्धेच्या यजमानाची निवड केली जाईल. मात्र, बीसीसीआय या स्पर्धेला मान्यता देण्याची शक्यता नसल्याचे कळते आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "आमच्या भविष्यातील दौऱ्याचे वेळापत्रक पूर्णपणे नियोजित आहे. याशिवाय इतरही अनेक पैलू आहेत आणि आतापर्यंतच्या स्थितीनुसार पाकिस्तानशी आयसीसी स्पर्धांमध्ये खेळवण्याच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. तसेच आम्हाला वाटत नाही की आयसीसी चार देशांची स्पर्धा आयोजित करण्यास तयार होईल आणि राझा यांचा हा प्रस्ताव नाकारला जाईल."

 फक्त ICC स्पर्धांमध्ये होत आहे सामना 

भारत आणि पाकिस्तानचे संघ २०१२ पासून फक्त आयसीसी आणि आशिया क्रिकेट परिषदेच्या टूर्नामेंटमध्ये आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघामध्ये मर्यादित षटकांची मालिका शेवटच्या वेळी २०१२ मध्ये झाली होती. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी देखील विदेशी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते की, द्विपक्षीय वचनबध्दता पूर्ण करण्यावर बोर्डाचे लक्ष आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी