IND vs NZ: रवीचंद्रन अश्विनने एजाज पटेलसाठी ट्विटवरून केली ही स्पेशल मागणी

R ashwin demand for Ajaz patel: एजाज पटेल एका कसोटीतील एका डावात १० विकेट घेणारा जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने परदेशी पिचवर इतक्या विकेट घेणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे. 

r ashwin
IND vs NZ: अश्विनने एजाज पटेलसाठी ट्विटवरून केली ही मागणी 
थोडं पण कामाचं
  • एजाज पटेल जिम लेकर आणि अनिल कुंबळेनंतर जगातील तिसरा गोलंदाज आहे ज्याने एका कसोटीत एका डावातील सर्व १० विकेट आपल्या नावे केल्यात.
  • तो जगातला पहिला गोलंदाज आहे ज्याने परदेशी भूमीवरील पिचवर ही जबरदस्त कामगिरी केली.
  • कुंबळे आणि लेकर यांनी एका डावात १० विकेट घेण्याची कमाल घरच्या मैदानावर केली होती. 

 Ajaj patel blue Tick । मुंबई: न्यूझीलंडविरुद्धच्या(india vs new zealand) कसोटी मालिकेत(test series) सर्वाधिक विकेट घेणारा भारताचा स्पिनर रवीचंद्रन अश्विनने(r ashwin) एजाज पटेलसाठी(ajaz patel) ट्विटरवरून(demand from twitter) एक खास मागणी केली आहे. किवी स्पिनर एजाज पटेलने भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक १७ विकेट घेतल्या. त्याने मुंबई कसोटीत भारताच्या सर्व विकेट आपल्या नावे केल्या होत्या. (R Ashwin demand for ajaz patel from official twitter account ) 

एजाज पटेल जिम लेकर आणि अनिल कुंबळेनंतर जगातील तिसरा गोलंदाज आहे ज्याने एका कसोटीत एका डावातील सर्व १० विकेट आपल्या नावे केल्यात. तो जगातला पहिला गोलंदाज आहे ज्याने परदेशी भूमीवरील पिचवर ही जबरदस्त कामगिरी केली. कुंबळे आणि लेकर यांनी एका डावात १० विकेट घेण्याची कमाल घरच्या मैदानावर केली होती. 

मुंबई कसोटी संपल्यानंतर अश्विनने ट्वीट केले. त्याचे हे ट्वीट अधिकृत हँडलवरून होते. त्याने लिहिले, डिअर व्हेरिफाईड एका डावात दहा विकेट घेणे निश्चितपणे या प्लॅटफॉर्मवर खरे असल्याचे पात्र आबे. यानंतर अश्विनने चेहऱ्यावर आनंद असलेली इमोजी पोस्ट केली आहे. 

एजाज पटेलचे ट्विटर अकाऊंट @AjazP आहे. दरम्यान, आतापर्यंत हे अकाऊंट व्हेरिफाईड झालेले नाही. व्हेरिफाईड न झाल्याने सामान्य युजर्स ही बाब नक्की करू शकत नाही की हे ट्विटर अकाऊंट खरोखर एजाज पटेलचे आहे की नाही. 

आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये भारताचे अव्वल स्थान

मुंबई कसोटीत भारताच्या मोठ्या विजयानंतर त्यांचे रेटिंग पॉईंट १२४ झाले आहे. तर ३४६५ अंक झाले आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या संघाचे ३०२१ अंक आणि १२१ रेटिंग पॉईंट आहेत. तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आणि चौथ्या स्थानावर इंग्लंडचा संघ आहे. पाचव्या स्थानावर पाकिस्तान आहे. यानंतर सहाव्या स्थानावर दक्षिण आफ्रिका, सातव्या स्थानावर श्रीलंका आणि आठव्या स्थानावर वेस्ट इंडिज आहे. रँकिंगमध्ये नवव्या स्थानावर बांगलादेश आणि दहाव्या स्थानावर झिम्बाबेचा संघ आहे. 

टीम इंडियाच्या घरच्या मैदानार १४वा विजय

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा घरच्या मैदानावरील १४वा विजय आहे. न्यूझीलंडला विजयासाठी या कसोटीत ५०४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र न्यूझीलंडचा संघ १६७ धावांवर आटोपला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी