T-20: या खेळाडूने टी-20मध्ये ठोकली Double Century, ठोकले 22 सिक्स

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 06, 2022 | 15:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rahkeem Cornwal: वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर क्रिकेर रहकीम कॉर्नवालने अमेरिकेतील एका टी-20 स्पर्धेत 77 बॉलमध्ये नॉटआऊट 205 धावा ठोकल्या. 

cricket
या खेळाडूने टी-20मध्ये ठोकली Double Century, ठोकले 22 सिक्स 
थोडं पण कामाचं
  • वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर रहकीम कॉर्नवालने अमेरिकेतील एका टी-20 स्पर्धेत 77 बॉलमध्ये नॉटआऊट 205 धावा ठोकल्या
  • यात त्याने 22 षटकार आणि 17 चौकार ठोकले.
  • अटलांटा ओपन टी-20 क्रिकेट स्पर्धेत अटलांटा फायरकडून खेळताना कॉर्नवालने आपल्या दुहेरी शतकाने संघाला 172 धावांनी विजय मिळवून दिला. 

मुंबई: टी-20 फॉरमॅटमध्ये(t-20 format) नेहमीच फलंदाजांची चलती असते. जेव्हा फलंदाज चौकार-षटकार ठोकतात तेव्हा प्रेक्षकांना अधिक उत्साह येतो. आता वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर कॉर्नवालने(west indies allrouner Rahkeem Cornwal अमेरिकेतील एका टी-20 स्पर्धएत दुहेरी शतक ठोकत इतिहास रचला आहे.Rahkeem Cornwal makes hits 205 runs in 77 balls in t-20 cricket 

अधिक वाचा - श्वास घेण्याची पद्धत बदला, आयुुष्य बदलेल!

या खेळाडूने ठोकले दुहेरी शतक

वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर रहकीम कॉर्नवालने अमेरिकेतील एका टी-20 स्पर्धेत 77 बॉलमध्ये नॉटआऊट 205 धावा ठोकल्या. यात त्याने 22 षटकार आणि 17 चौकार ठोकले. अटलांटा ओपन टी-20 क्रिकेट स्पर्धेत अटलांटा फायरकडून खेळताना कॉर्नवालने आपल्या दुहेरी शतकाने संघाला 172 धावांनी विजय मिळवून दिला. 

ठोकले 22 षटकार

प्रसिद्ध मोहनदास मेनन यांनी गुरूवारी सकाळी याबाबत ट्वीट केले. त्यांनी लिहिले, वेस्ट इंडिजच्या रहकीम कॉर्नवालने 77 बॉलमध्ये नाबाद 205 धावा केल्या. यात 22 षटकार आणि 17 चौकारांचा समावेश होता. विजेता संघाला 75,000 डॉलर रक्कम आहे. अटलांटा ओपन या नावाने अमेरिकेत टी-20 स्पर्धा खेळवली जाते. यात विजयी संघाला 75 हजार डॉलरची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. 

रहकीमच्या दुहेरी शतकामुळे त्याच्या संघाने स्क्वेअर ड्राईव्हविरुद्ध खेळताना केवळ एक विकेट गमावत 326 धावा केल्या. यात रहकीमच्या संघाचा 172 धावांनी विजय झाला. प्रतिस्पर्धी संघाला केवळ 154 धावाच करता आल्या. 

स्वत:ला म्हटले होते 360 डिग्री खेळाडू

रहकीम कॉर्नवालने नुकताच दावा केला होता की तो 360 डिग्री खेळाडू आहे. त्याने म्हटले होते की तो हिटिंगचा सराव करत नही. आतापर्यंत त्याने 66 टी20 सामने खेळलेत यात त्याने 147.49च्या स्ट्राईक रेटने 1146 धावा केल्यात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी