कोण आहे हा साडे सहा फूट उंच आणि १४० किलो वजनाचा क्रिकेटर? आता भारताविरुद्ध खेळणार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 10, 2019 | 19:15 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

एकीकडे क्रिस गेल निवडला न गेल्याने चर्चेचे कारण ठरला आहे तर दुसरीकडे कसोटी संघात रहकीम कॉर्नवालच्या निवडीने साऱ्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष त्याच्याकडे लागले आहे.

rakheema cornwall
रहकीम कॉर्नवाल 

थोडं पण कामाचं

  • २२ ऑगस्टपासून सुरू होतेय भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान कसोटी मालिका
  • कसोटी संघात क्रिस गेलला स्थान नाही
  • रहकीम कॉर्नवाल करू शकतो डेब्यू

मुंबई: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने आपल्या कसोटी संघाची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने आपला सलामीचा क्रिकेटर क्रिस गेलला संघाबाहेर ठेवला आहे. तर २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघात साडे सहा फूट लांब आणि १४० किलो वजनाच्या रहकीम कॉर्नवालला स्थान देण्यात आले आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना अँटिग्वा तर दुसरा सामना जमैकामध्ये खेळवला जाणार आहे. 

एकीकडे क्रिस गेलला संघात स्थान न दिल्याने त्याची चर्चा होतेय तर तर दुसरीकडे कसोटी संघात रहकीम कॉर्नवालच्या निवडीने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. अँटिग्वामध्ये जन्मलेल्या कॉर्नवालची उंची ६.५ फूट आणि वजन १४० किलो इतके आहे. तो जगातील सर्वात विशाल क्रिकेटर मानला जातो. हा २६ वर्षीय ऑलराऊंडर क्रिकेटरने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र त्याच्या फिटनेसमुळे त्याला संघात सामील केले जात नव्हते. मात्र आता त्याला कॅरेबियनच्या कसोटी संघात सामील करण्यात आले आहे. त्यामुळे याद्वारे त्याला भारताविरुद्धच्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. 

कॉर्नवाल आपल्या स्पिन गोलंदाजीसोबत आपल्या फलंदाजीसाठीही ओळखला जातो. हा विशाल क्रिकेटर मैदानावर गगनचुंबी षटकार ठोकण्यासाठी ओळखला जातो. यातच त्याला जर भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाल्या तो आपल्या कामगिरीने निवड समितीला प्रभावित करेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मोठमोठे षटकार ठोकणाऱ्या या क्रिकेटरला कोणतेही मैदान मोठे नाही आहे. यातच २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कसोटीत प्रेक्षकांना टी-२०ची मजा पाहायला मिळू शकते. 

कॉर्नवालच्या रेकॉर्डबाबत बोलायचे झाल्यास त्याने स्थानिक स्तरावर क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. कॉर्नवालने ५५ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये ९७ डावांमध्ये २४.४३ च्या सरासरीने २२२४ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १ शतक आणि १३ अर्धशतकेही ठोकली आहे. या दरम्यान त्याने ५४ कॅचही पकडल्या आहेत. त्यामुळे भारताविरुद्ध त्याची कामगिरी कशी असणार हे पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक झाले आहेत.

वेस्ट इंडिजचा संघ यावेळी भारताविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. पहिली वनडे पावसामुळे धुतली गेल्याने वनडे सीरिजची मजा कमी झाली आहे. आतापर्यंत भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध एकतर्फी विजय मिळवण्यात यश मिळाले आहे. यातच हे पहावे लागेल की टी-२० सीरिज ३-०ने गमावल्यानंतर आता विंडीज संघ मालिकेत पुनरागमन करणार का हे पहावे लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
कोण आहे हा साडे सहा फूट उंच आणि १४० किलो वजनाचा क्रिकेटर? आता भारताविरुद्ध खेळणार Description: एकीकडे क्रिस गेल निवडला न गेल्याने चर्चेचे कारण ठरला आहे तर दुसरीकडे कसोटी संघात रहकीम कॉर्नवालच्या निवडीने साऱ्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष त्याच्याकडे लागले आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...