महाराष्ट्राच्या राहुल आवारेने जागतिक कुस्ती स्पर्धेत रचला नवा इतिहास

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 22, 2019 | 19:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rahul Aware in World Wrestling Championship: जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय पैलवान राहुल आवारे याने कांस्यपदक जिंकलं आहे. राहुल आवारे याने अमेरिकेच्या पैलवानावर मात करत कांस्यपदक पटकावलं आहे.

rahul aware world wrestling championship bronze medal beats american champion tyler lee graff sports news marathi
राहुल आवारे  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पैलवान राहुल आवारे ने घडवला नवा इतिहास
  • जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुल आवारेने पटकावलं कांस्यपदक
  • अमेरिकन पैलवानावर मात करत पटकावलं कांस्यपदक
  • जागतिक कुस्ती स्पर्धेत पदकविजेता राहुल पहिला महाराष्ट्रीयन पैलवान

कझाकिस्तान: भारताचा कुस्तीपटू राहुल आवारे याने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं आहे. रविवारी ६१ किलो वजनी गटाच्या स्पर्धेत अमेरिकेच्या टेलर ली ग्राफ याचा पराभव केला. टेलर ली ग्राफ याचा ११-४ ने पराभव करत राहुल आवारे याने कांस्यपदक आपल्या नावावर केलं आहे.

जागतिक कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राकडून कांस्यपदक जिंकणारा राहुल आवारा हा पहिलाच पैलवान ठरला आहे. राहुल आवारे याने अमेरिकन पैलवानावर मात करत कांस्यपदक जिंकलं त्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

अमेरिकन पैलवान टेलर ली ग्राफ याने सुरुवातीलाच आक्रमकपणा दाखवत पॉईंट्स मिळवले. मात्र, त्यानंतर मराठमोळ्या राहुल आवारे याने आपला खेळ दाखवण्यास सुरुवात केली आणि एक-एक करुन पॉईंट्स मिळवण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे राहुल आवारे याने टेलर ली ग्राफ याच्यावर ११-४ ने विजय मिळवत कांस्यपदक आपल्या नावावर केलं.

कॉमनवेल्थमध्ये गोल्ड मेडल आणि एशियन गेम्समध्ये दोनवेळा पदक जिंकलेल्या राहुल आवारे याने अमेरिकन पैलवानाचा ११-४ ने पराभव करत विजय मिळवला. या विजयासोबतच राहुल आवारेने पहिलं वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक जिंकलं आहे. राहुल आवारे याने केलेली ही कामगिरी त्याची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं बोललं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी