Rahul Dravid Head Coach राहुल द्रविड टीम इंडियाचा हेड कोच

Rahul Dravid appointed as Head Coach for Team India भारताच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड याची निवड झाल्याचे बीसीसीआयने ट्वीट करुन जाहीर केले. 

Rahul Dravid appointed as Head Coach for Team India
राहुल द्रविड टीम इंडियाचा हेड कोच 
थोडं पण कामाचं
  • राहुल द्रविड टीम इंडियाचा हेड कोच
  • राहुल द्रविड २०२३ पर्यंत भारताच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहणार
  • भारत-न्यूझीलंड मालिकेपासून राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून काम सुरू करेल

Rahul Dravid appointed as Head Coach for Team India । मुंबईः भारताच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड याची निवड झाल्याचे बीसीसीआयने ट्वीट करुन जाहीर केले. 

टी २० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा संपताच सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपेल. भारत-न्यूझीलंड मालिकेपासून राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून काम सुरू करेल. राहुल द्रविड २०२३ पर्यंत भारताच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहणार आहे. बीसीसीआय द्रविड सोबतच्या कराराची मुदत वाढवायची की कमी करायची याचा निर्णय पुढील काही स्पर्धांतील द्रविडच्या प्रशिक्षक म्हणून होणाऱ्या कामगिरीआधारे घेईल. पारस म्हाम्ब्रे याची भारताच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती होईल. 

राहुल द्रविड ४८ वर्षांचा आहे. तो सध्या बंगळुरू येथे बीसीसीआयने स्थापन केलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा मुख्य प्रशिक्षक आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्यात त्याने टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून काम केले होते. द्रविड सध्या १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघ यांनाही प्रशिक्षण देत आहे. याआधी द्रविडने २०१६ आणि २०१७ मध्ये बीसीसीआयकडून संधी मिळत असूनही टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी नाकारली होती. तरुण क्रिकेटपटूंना शिकवणे आवडते, असे कारण देत त्याने क्रिकेट अकादमीच्या कामात स्वतःला गुंतवले होते. पण यावेळी त्याने भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याचा निर्णय घेतला आहे. 

मी ज्यांना तरुण क्रिकेटपटू म्हणून शिकवले असे काही खेळाडू आता भारतासाठी खेळत आहेत. ही आनंदाची बाब आहे, असे राहुल द्रविडने सांगितले. 

राहुल द्रविडने १६४ कसोटी सामन्यात १३ हजार २८८ धावा केल्या. तसेच त्याने ३४४ वन डे मध्ये १० हजार ८८९ धावा केल्या. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून तो काय कामगिरी करणार याबाबत मतमतांतरे आहेत. पण अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी द्रविडचे नवी जबाबदारी स्वीकारली म्हणून कौतुक केले. तसेच द्रविड चांगली कामगिरी करेल, अशी आशा व्यक्त केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी