Team india coach:राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकासाठी केला अर्ज, लक्ष्मण बनू शकतो नवा एनसीए प्रमुख

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 26, 2021 | 20:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि एनसीएचे सध्याचे प्रमुख राहुल द्रविडने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. 

rahul dravid
राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकासाठी केला अर्ज 
थोडं पण कामाचं
  • सर्व अटकळींना विराम लावताना राहुल द्रविडने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. 
  • २६ ऑक्टोबरला पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • द्रविडनंतर व्हीव्हीएस लक्ष्मण बनू शकतो एनसीएचा प्रमुख

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे पुढील प्रशिक्षक(team india coach) बनत असलेला माजी कर्णधार राहुल(former captain rahul dravid) द्रविडने मंगळवार या पदासाठी अधिकृतपणे अर्ज(application) सादर केला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख द्रविड यांनी अर्ज केल्याने क्रिकेट सल्लागार समितीचे काम सोपे झाले आहे. कारण त्यांच्याइतक्या मोठ्या व्यक्तीचे नाव या पदासाठीच्या शर्यतीत नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुल(sourav ganguly) आणि सचिव जय शाह यांची एकमेव पसंती द्रविडला आहे. rahul dravid filed his application for team india coach

बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पीटीआयला सांगितले, राहुलने औपचारिकपणे अर्ज केला आहे. कारण आज अर्ज करण्याची शेवटची तारीख होती एनसीएकडून टीम गोलंदाजी कोच पारस ब्राम्हे आणि क्षेत्ररक्षण कोच अभय शर्मा यांनी आधीच अर्ज केला आहे. त्यांचा हा अज केवळ औपचारिक होता. 

आयपीएल फायनलदरम्या हेड कोचबाबत झाली होती चर्चा

द्रविडने नुकतीच दुबईमध्ये आयपीएल फायनलच्या वेळेस बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली. गांगुली आणि शाहने यांनी त्याला पुन्हा आयसीसी टी-२० वर्ल्डकप पद सांभाळण्यास सांगितले. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेटच्या नव्या दौऱ्याची सुरूवात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेविरुद्ध होईल. यात नवा कर्णधार टीमचे नेतृत्व करणार आहे. 

व्ही व्ही एस लक्ष्मण होऊ शकतो नवा एनसीए चीफ

भारताचा माजी महान फलंदाज व्हीव्ही एस लक्ष्मणने पुन्हा एकदा एनसीए प्रमुखपदाच्या शर्यतीत आहे. सूत्रांकडून समजले की लक्ष्मण आता आयपीएल टीम सनरायजर्स हैदराबादचा मेंटर राहिलेला नाही. अशातच त्याची निवड झाल्यास त्याला कॉमेंट्री आणि कॉलम लिहिण्याचे आपले काम सोडावे लागेल. 

लक्ष्मणशी संपर्क करणार बीसीसीआय

भारतीय क्रिकेटच्या हितामध्ये राष्ट्रीय कोच आणि एनसीए प्रमुख मिळून काम करत आहेत. लक्ष्मणने या पदासाठी अजिबात आवड नव्हती मात्र बीसीसीआयने पुन्हा संपर्क केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी