IND vs SA: कोच बनताच Rahul Dravid ने घेतला Virat Kohliचा क्लास! व्हिडिओ व्हायरल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 20, 2021 | 14:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs SA: भारताने आतापर्यंत द. आफ्रिकेच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकलेली नाही. मात्र या वर्षी नवीन कोच राहुल द्रविडसोबत मिळून कर्णधार कोहलीला ही कामगिरी करायची आहे. 

team india
कोच बनताच Rahul Dravid ने घेतला Virat Kohliचा क्लास!  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारत वि. द. आफ्रिका कसोटी मालिका
  • राहुल द्रविडने घेतला विराट कोहलीचा क्लास
  • नेट सेशनचा व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई: टीम इंडिया(team india) या महिन्याच्या २६ तारखेपासून द. आफ्रिकेविरुद्ध(india vs south africa) ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भिडणार आहे. भारताने(india) आतापर्यंत एकदाही द. आफ्रिकेला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत हरवलेले नाही. मात्र या वर्षी नवीन कोच राहुल द्रविडसोबत(rahul dravid) मिळून विराटला(virat kohli) ही कामिगिरी करायची आहे. त्यासाठी द्रविड स्वत: विराट कोहलीवर खूप लक्ष देऊन आहे. rahul dravid gave coaching to virat kohli during team india practice session

द्रविडने घेतला विराट कोहलीचा क्लास

नुकताच बीसीसीआयने टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टिसचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये कोच राहुल द्रविड सर्व खेळाडूंकडून द. आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी तयारी करताना दिसत आहेत. खासकरून द्रविडचे सर्वाधिक लक्ष हे विराट कोहलीवर होते. विराट गेल्या वेळेस द. आफ्रिका दौऱ्यावरील सर्वात यशस्वी फलंदाज होता. अशातच द्रविडने टूर सुरू होण्याआधी त्याचा जोरदार क्लास घेतला. 

टीम इंडियाची पूर्ण तयारी

भारतीय क्रिकेट संघाचे पहिले पूर्ण ट्रेनिंग सेशन सुरू झाले आहे. सुपरस्पोर्ट पार्कमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीमला मुख्य को राहुल द्रविडने कोचिंगचे गुण शिकवले. सराव सामना नसल्याने संघातील फलंदाज आणि गोलंदाजांना या पिचसोबत चांगला ताळमेळ ठेवणे गरजेचे असणार आहे. हे संघाचे पूर्ण ट्रेनिंग सत्र होते जिथे मैदानात उतरण्याआधी जॉगिंग आणि स्ट्रेचिंग करण्यात आली. तर कोच द्रविड कोहलीला फलंदाजीच्या टिप्स देताना दिसला. यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्च्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर कसोटी क्रिकेट खेळण्यास तयार आहे. मोहम्मद शमी, आर. अश्विन आणि अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मानेही नेट्सवर गोलंदाजी केली.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, उमेश यादव, श्रेयस अय्यर. , मोहम्मद सिराज, प्रियांक पांचाळ.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी