Ind vs NZ:कानपूर टेस्टनंतर राहुल द्रविडने असे काही केले की तुम्ही म्हणाल...वा...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 30, 2021 | 13:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ind vs NZ: भारतीय क्रिकेट संघाचे नवे कोच राहुल द्रविडने शिव कुमार यांच्या नेतृत्वात ग्रीन पार्क मैदानात चांगली पिच तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३५ हजार रूपयांची रक्कम देत सन्मानित केले. 

rahul dravid
Ind vs NZ:कानपूर टेस्टनंतर राहुल द्रविडने असे काही केले की.. 
थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेश क्रिकेट संघाने खेळानंतर प्रेस बॉक्समध्ये अधिकृत घोषणा केली,
  • राहुल द्रविड यांनी मैदानातील कर्मचाऱ्यांना व्यक्तिगतपणे ३५ हजार रूपये दिले आहेत.
  • निष्पक्ष खेळ भावना कशी जोपासावी हे द्रविडने आपल्या खेळीदरम्यान अनेकदा दाखवले आहे.

India vs new zealand, kanpur test: भारतीय क्रिकेट संघाचा नवा कोच राहुल द्रविडने(indian team coach rahul dravid) शिव कुमार यांच्या नेतृत्वात ग्रीन पार्क मैदानावर(green park ground) चांगली पिच तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३५ हजार रूपये देऊन त्यांचा सन्मान केले. भारतात जन्मलेले एजाज पटेल आणि रचिन रवींद्र यांनी शानदार संयम बाळगत अंतिम विकेट वाचवून ठेव यजमानसंघाविरुद्ध न्यूझीलंडचा(india vs new zealand test) पराभव टाळला. Rahul Dravid gives 35000 rupees to groundman for pitch of Kanpur test 

उत्तर प्रदेश क्रिकेट संघाने खेळानंतर प्रेस बॉक्समध्ये अधिकृत घोषणा केली, आम्ही एक अधिकृत घोषणा करू इच्छितो. राहुल द्रविड यांनी मैदानातील कर्मचाऱ्यांना व्यक्तिगतपणे ३५ हजार रूपये दिले आहेत. निष्पक्ष खेळ भावना कशी जोपासावी हे द्रविडने आपल्या खेळीदरम्यान अनेकदा दाखवले आहे. मैदानाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेली ही रक्कम याचे प्रतीक होते की पिचमध्ये सामन्याच्या पाचही दिवशी गोलंदाज आणि फलंदाजांसाठी काहीतरी होते. 

स्पिनर आणि पेसर दोघांना मिळाली मदत 

या पिचवर जिथे शानदार टेक्निट दाखवणारे श्रेयस अय्यर, शुभमन गिल, टॉम लॅथम आणि विल यंग सारख्या गोलंदाजांनी धावा केल्या तर दुसरीकडे टीम साऊदी आणि काईल जॅमीसन सारख्या वेगवान गोलंदाजांनी भारताच्या पहिल्या फळीला त्रस्त केले. पिचमुळे भारताच्या स्पिनर्सनाही मदत मिळाली. 

सामन्यानंतर अश्विन म्हणाला, आम्ही चांगल्या क्षेत्रात गोलंदाजी करत होतो, आम्हाला माहीत होते की आमच्याकडे वेळ आहे. २८४ धावांचे लक्ष्य कठीण होणारे होते. मात्र न्यूझीलंडच्या संघाने पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात एकही विकेट गमावला नाही. 

पहिली कसोटी अनिर्णीत

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी अनिर्णीत राखण्यात न्यूझीलंडला यश मिळाले. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर २८४ धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र दिवसाचा खेळ संपल्याने सामन्याचा निकाल लागू शकला नाही. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 98व्या षटकात 9 बाद 165 धावा केल्या. 

अश्विनची कमाल

या कसोटीत रवीचंद्रन अश्विनने जबरस्त रेकॉर्ड केला. अश्विन कसोटीत 418व्या धावा घेत भारताचा नंबर वन ऑफस्पिनर बनला. अश्विनने दुसऱ्या डावात टॉम लॅथमला (52) बॉलिंग करून हा टप्पा गाठला. त्याने अनुभवी ऑफस्पिनर हरभजनला मागे टाकले आहे, ज्याने 417 कसोटी बळी घेतले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी