IND VS NZ: राहुल द्रविडने कसोटी मालिकेआधी चालवला मास्टर स्ट्रोक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 23, 2021 | 12:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. टीम इंडियाच्या सलामीवीरांमध्ये होणार बदल. 

dravid
IND VS NZ: द्रविडचा कसोटी मालिकेआधी मास्टर स्ट्रोक 
थोडं पण कामाचं
  • शुभमन गिल न्यूझीलंड मालिकेत मिडल ऑर्डरला खेळताना दिसणार आहे.
  • टीम इंडियाच्या सलामीवीराची जबाबदारी लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल सांभाळणार आहेत.
  • कसोटी मालिकेत रोहित शर्माला आराम देण्यात आला आहे

मुंबई: न्यूझीलंडलाd(new zealan) टी-२० मालिकेत(t-20 series) ३-० असा क्लीनस्वीप दिल्यानंतर टीम इंडियाचे(team india) पुढील लक्ष्य कसोटी मालिकेत एकतर्फी विजय मिळवण्यावर असेल. कसोटी मालिकेची(test series) सुरूवात २५ नोव्हेंबरपासून होत आहे. याचा पहिला सामना कानपूरच्या(kanpur) ग्रीनपार्क स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान कसोटी मालिका सुरू होण्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार टीम इडिया मॅनेजमेंटने भारताच्या कसोटी सलामीवीर बलण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीवीर म्हणून सातत्याने शुभमन गिलला(shubhman gill) टीम इंडियाने या स्थानावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.Rahul dravid master stroke against new zealand test series

मिळालेल्या माहितीनुसार शुभमन गिल न्यूझीलंड मालिकेत मिडल ऑर्डरला खेळताना दिसणार आहे. तर टीम इंडियाच्या सलामीवीराची जबाबदारी लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल सांभाळणार आहेत. कसोटी मालिकेत रोहित शर्माला आराम देण्यात आला आहे या कारणामुळे मयांक अग्रवालला संधी मिळत आहे. इंग्लंड दौऱ्यावर मयांक अग्रवाल एकही सामना खेळू शकला नव्हता. ओपनिंग रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने केली होती आणि शुभमन गिल दुखापतीमुळे भारतात परतला होता. 

शुभमन गिलला सलामीवीराच्या स्थानावरून हटवण्याचा निर्णय योग्य?

यात कोणतेच दुमत नाही की शुभमन गिल खूप टॅलेंटेड आहे आणि त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मात्र एक सलामीवीर म्हणून त्याच्या टेक्निकमध्ये कमतरता दिसून येतात. गिलने आतापर्यंत ८ कसोटी सामन्यांमध्ये ३१.८४च्या सरासरीने ४१४ धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून ३ अर्धशतके निघाली. शुभमन गिल सुरूवातीच्या ओव्हरमध्ये स्विंगविरुद्ध खेळताना कमकुवत दिसतो मात्र स्पिनर्सविरुद्ध त्यांची बॅट चांगली चालते. यासाठी राहुल द्रविडने गिलला हटवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या कसोटी विराट कोहलीही नाही अशातच रहाणे चौथ्या स्थानावर आणि गिल पाचव्या स्थानावर खेळू शकतो. गिल मधल्या फळीत गेल्याने मयांक अग्रवाललाही संधी मिळेल. चांगला फॉर्म असतानाही त्याचा बेंचवर बसावे लागत आहे. 

न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया - अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी