video: राहुल द्रविडला पहिल्यांदा चिडलेले पाहून सगळ्यांनाच बसला आश्चर्याचा धक्का, विराट कोहलीची ही रिअॅक्शन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 12, 2021 | 12:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rahul Dravid: टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. द्रविड भर रस्त्यात लोकांवर चिडताना दिसत आहे. यावर विराट कोहलीने देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

rahul dravid
राहुल द्रविडचे हे रूप तुम्ही याआधी पाहिले नसेल... 

थोडं पण कामाचं

  • राहुल द्रविडची नवी जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल
  • राहुल द्रविड भर रस्त्यात लोकांवर चिडतोय
  • विराट कोहलीने यावर दिली अशी प्रतिक्रिया

मुंबई: भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला(india former captain rahul dravid) तुम्ही कधी असे चिडलेले पाहिले आहे का? तुमचे उत्तर हे नाही असेच असेल. मात्र सध्या सोशल मीडियावर(social media) त्याची एक जाहिरात(advertise) व्हायरल होतेय. यात तो भरपूर चिडलेला दिसत आहे. त्याची ही वेगळी बाजू लोकांना पाहायला मिळत आहे. खरंतर, राहुल द्रविडची एक जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच गाजतेय. द्रविड खरंतर शांत आणि सौम्य स्वभावासाठी ओळखला जातो. त्याच्या या अशा स्वभावामुळेच अनेक चाहत्यांना तो आवडतो. 

दरम्यान, या नव्या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड पूर्णपणे वेगळ्याच रूपात दिसत आहे. द्रविड इतक्या रागात आहे की आपल्या बॅटने तो दुसऱ्याच्या कारच्या बाजूचा आरसाही तोडतो. तसेच आसपासच्या लोकांवर तो आपला राग व्यक्त करताना दिसत आहे. कारवर जो रागाने जोरजोरात ओरडत आहे. द्रविडच्या या जाहिरातीची चांगलीच चर्चा होत आहे. टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(royal challengers bangalore)चा कर्णधार विराट कोहलीनेही राहुल द्रविडचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

कर्णधार विराट कोहलीची रिअॅक्शन

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही राहुल द्रविडच्या या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, राहुल भाईचा हा अंदाज यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. यासोबतच त्याने हसणारा इमोजी शेअर केला आहे. क्रिकेट हा जेंटलमेनचा खेळ समजला जातो आणि द्रविड याचे उत्तम उदाहरण आहे. 

राहुल द्रविडचा हा नवा व्हिडिओ सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. राहुल द्रविडचा हा राग अनेकांना आवडला. जाहिरातीत असे दाखवले आहे की राहुल द्रविड महिलेच्या काचेवर ग्लास फेकतात तर कोणाला चिडून सांगतात की ते त्यांना मारतील. द्रविड रागातच आपल्या कारचे स्टेअरिंग जोरात दाबतात तर बाजूच्या गाडीचा साईड मिरर तोडतात. इतकंच नव्हे तर द्रविड आपल्या कारवर उभे राहत बॅट दाखवून सगळ्यांना धमकी देतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी