India vs England: सेमीफायनलमध्ये होणार या खेळाडूंचे पुनरागमन! कोच राहुल द्रविडने दिलेत हे संकेत

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 07, 2022 | 16:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या  टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध सामना रंगणार आहे. हा सामना गुरूवारी अॅडलेडमध्ये खेळवला जाईल. यासाठी कोच राहुल द्रविडने खास तयारी सुरू केली आहे. 

rahul dravid
सेमीफायनलमध्ये होणार या खेळाडूंचे पुनरागमन! द्रविडचे संकेत 
थोडं पण कामाचं
  • अॅडलेडच्या परिस्थितीनुार भारतीय प्लेईंग 11मध्ये बदल केले जातील
  • अशातच पाहिले असता लेग स्पिनर युझवेंद्र चहलला प्लेईंग 11मध्ये संधी मिळू शकते.
  • कारण अॅडलेडची पिच साधारणपणे स्लोअर बॉलर्सना मदतीची ठरते.

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने() टी20 वर्ल्ड कप 2022 ()च्या सेमीफायनलमध्ये धमाकेदार पद्धतीने एंट्री केली. सुपर  12मध्ये आपल्या ग्रुप 2मध्ये अव्वल स्थान राखणाऱ्या भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी मुकाबला होणार आहे. इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलचा सामना गुरूवारी 10 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघाचे कोच राहुल द्रविड यांनी खास तयारी सुरू केली आहे. सोबतच द्रविडने या सामन्यात मोठ्या बदलाचेही संकेत दिलेत. rahul dravid says about playing 11 against england in semifinal

अधिक वाचा - VIDEO: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

द्रविडने सांगितले, अॅडलेडच्या परिस्थितीनुार भारतीय प्लेईंग 11मध्ये बदल केले जातील. अशातच पाहिले असता लेग स्पिनर युझवेंद्र चहलला प्लेईंग 11मध्ये संधी मिळू शकते. कारण अॅडलेडची पिच साधारणपणे स्लोअर बॉलर्सना मदतीची ठरते. सोबतच अनुभवी क्रिकेटर विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकही संघात परतू शकतो. तर ऋषभ पंतला पुन्हा बेंचवर बसवले जाऊ शकते. 

15 खेळाडूंमध्ये कोणालाही मिळू शकते संधी

द्रविडने मीडियाशी बोलताना सांगितले, मला वाटत की आमचा 15 सदस्यीय संघ आमच्यासाठी पूर्णपणे ओपन माईंड आहे. आम्हाला विश्वास आहे की जे खेळाडू 15 सदस्यीय संघात आहेत ते आम्हाला कमकुवत बनवणार नाहीत. आम्ही असा संघ निवडला आहे. आम्ही तेथे जाऊ आणि परिस्थिती पाहू. मी तेथे आज काहीसामने पाहिले आणि मला माहीत आहे की तेथील ट्रॅक थोडा स्लो आहे. तेथे ग्रिप्ड आहे. थोडा टर्नही आहे आम्ही अॅडलेडमध्ये पूर्णपणे नव्या पिचवर खेळू.

स्थिती आणि पिचच्या हिशोबाने प्लेईग 11 उतरवणार

भारताच्या कोचनी सांगितले, आम्ही बांगलादेशविरुद्द ज्या पिचवर खेळलो होतो इमानदारीने सांगतो तेथे कोणताही स्पिन नव्हता. हा एक वेगळ्याच प्रकारचा विकेट होता. अॅडलेडमध्ये अशाच प्रकारची पिच असेल. माझ्या मते एका सामन्यानंतर मी येथे बसून कोणतीच भविष्यवाणी करू शकत नाही. आमच्याकडे काही दिवस आहेत. आम्ही पिच पाहू आणि त्यानंतर ठरवू की काय करता येईल. 

द्रविडने पुढे सांगितले, नक्कीच जर ही पिच स्लो आहे तर आम्ही त्या स्थितीनुसार खेळू. आम्हाला वाटते की थोडी वेगळी पिच असेल तर आम्हाला त्या हिशेबाने टीम बनवावी लागेल. द्रविडच्या विधानावरून हे स्पष्ट होते की ते आणि टीम मॅनेजमेंट अॅडलेडमधील सध्याची स्थिती आणि पिचच्या हिशेबाने प्लेईंग 11 उतरवणार. 

अधिक वाचा - शिवसेना नेत्याकडून सुप्रिया सुळेंना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी.

स्टँडबाय खिलाड़ी: श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकुर. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी