Ind vs SL: ड्रेसिंग रूममधून धावत डगआऊटमध्ये पोहोचला द्रविड, चाहरला पाठवला हा मेसेज

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 21, 2021 | 18:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

राहुल द्रविड ड्रेसिंग रूमच्या पायऱ्या उतरून डगआऊटमध्ये पोहोचला आणि राहुल चहरकडे जाऊन बसला. त्याने दीपक चाहरचा भाऊ राहुल चहरला काही मेसेज दिला जो दीपक चहरसाठी होता. 

rahul dravid
राहुल द्रविडला सामन्यादरम्यान दीपक चहरसाठी खास मेसेज 

थोडं पण कामाचं

  • प्रशिक्षख राहुल द्रविड ड्रेसिंग रूममधून डगआऊटमध्ये पोहोचला
  • द्रविडने दीपकसाठी राहुलकडे मेसेज दिला

मुंबई: राहुल द्रविडने टीम इंडियासाठी आपल्या कोचिंगची सुरूवात जबरदस्त केली आहे. त्याच्या प्रशिक्षणामुळे टीम इंडिया दोन सामने खेळली आणि दोन्ही सामन्यात त्यांनी विजय मिळवला. श्रीलंकोविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना एकतर्फी होता आणि टीम इंडियाने यात ७ विकेटनी विजय मिळवला. तर दुसरा सामा काँटे की टक्कर ठरला. कोलंबोत खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेकडून विजय खेचून आणला. 

या सामन्यात एका वेळेस विजय श्रीलंकेच्या पारड्यात पडत होता. भारतीय संघाची अवस्था ७ बाद १९३ अशी झाली होती. टीम इंडियाच्या विजयाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या. मात्र दीपक चहरने काही चांगले शॉट लगावत आशा पुन्हा पल्लवित केल्या. त्याने भुवनेश्वर कुमारसह आठव्या विकेटासाठी ८४ धावांची भागीदारी केली. आणि टीम इंडियाला तीन विकेटनी विजय मिळवून दिला. 

या भागीदारीदरम्यान संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने काही नोटीस केले आणि तो आपल्यापर्यंत ठेवू शकला नाही. तो ड्रेसिंग रूमच्या पायऱ्या उतरत डगआऊटमध्ये पोहोचला आणि राहुल चहरकडे गेला. त्याने दीपकचा भाऊ राहुल चहरला काही मेसेज दिला जो दीपकसाठी होता. 

दीपक चहरने सामन्यानंतर या मेसेजबद्दल सांगितले की. राहुल द्रविड सरांनी मला सांगितले होते की मी प्रत्येक बॉल खेळावा. राहुल सरांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. हे माझ्यासाठी गेम चेंजर होते. 

सामन्यानंतर भुवनेश्वर म्हणाला, दीपक चहर राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली इंडिया एसाठी खेळला आहे. यासाठी त्यांना माहीत होते की तो फलंदाजी करू शकतो. तसेच काही बॉल हिट करू शकतो. त्याने आल्या फलंदाजीने हे सिद्ध केले. 

श्रीलंकेने दिलेल्या 275 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. अवघ्या 197 धावांवर 7 गडी बाद झाल्याने  भारताची जिंकण्याची आशा मावळली होती.  7 गडी बाद असल्यामुळे श्रीलंकेचे पारडे जड होते. मात्र दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारची खेळी निर्णायक ठरली. दोघांनी 84 धावांची अभेद्य भागिदारी करत संघाला सामना आणि मालिका जिंकून दिली. लंकेने दिलेलं आव्हान पार करताना  मागील सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलेला पृथ्वी शॉ अवघ्या 13 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेला ईशान किशनही एक धाव करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार शिखर धवनही 29 धावा करुन बाद झाला.

शिखर धवननंतर सूर्यकुमार यादव आणि मनिष पांडेने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मनिष पांडे 37 धावांवर रनआऊट झाला. मनिषनंतर आलेला हार्दिक पांड्याही खातं न उघडताच तंबूत परतला. त्यानंतर अर्धशतक साजरं करुन सूर्यकुमार यादवही बाद झाला. त्याने 53 धावा केल्या. कृणाल पांड्यावर भारताच्या खेळाची धुरा उरलेली असताना तोही 35 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताने हा सामना गमावला अशी स्थिती असताना दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारने जबाबदारीने खेळी करत टीम इंडियाला विजयापर्यंत नेले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी