ज्युनिअर द्रविडही 'द वॉल' बनण्याच्या दिशेने?  २ महिन्यात झळकावले २ द्विशतक 

भारतीय क्रिकेटमध्ये 'द वॉल' नावाने ओळखल्या जाणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.

राहुल द्रविड, क्रिकेट, टीम इंडिया, बंगळुरू, समित द्रविड, द्विशतक, राहुल द्रविडच्या मुलाचे द्विशतक, द वॉल, Rahul Dravid, Son Samit, Slams Second Double-Century, Inside Two Months In U-14 Cricket
ज्युनिअर द्रविडही 'द वॉल' बनण्याच्या दिशेने?  २ महिन्यात झळकावले २ द्विशतक   |  फोटो सौजन्य: फेसबुक

थोडं पण कामाचं

  • समित द्रविडने अंडर १४ मध्ये झळकावले जोरदार द्विशतक 
  • ज्युनिअर द्रविडने डिसेंबरमध्ये बनवले होते पहिले द्विशतक 
  • वडिलांच्या पावलावर ठेवतोय पाऊल

बंगळुरू :  भारतीय क्रिकेटमध्ये 'द वॉल' नावाने ओळखल्या जाणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. समितने दोन महिन्यात दोन द्विशतक झळकावले आहेत. नुकतेच त्याने बंगळुरूमध्ये आपल्या माल्या अदिती इंटरनॅशनल (MAI) कडून प्रतिनिधित्व करताना अंडर १४ क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले आहे. बीटीआर शील्ड अंडर १४ ग्रुप -१ डिव्हिजन II टुर्नामेंटमध्ये समित द्रविडने केवळ १४४ चेंडूंत नाबाद २११ धावांची जोरदार खेळी केली. यात त्याने २४ चौकार आणि एक षटकार लगावला. 

समित द्रविड यांच्या द्विशतकाच्या जोरावर त्यांच्या संघाने निर्धारित ५० षटकांत ३ विकेटच्या बदल्यात ३८६ धावांचा विशाल स्कोअर उभारला. या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बीजीएस नॅशनल पब्लिक स्कूलचा संघ ३ बाद २५४ धावाच करू शकला. एणएआय संघाचा १३२ धावांनी विजय झाला. समित द्रविड याने यापूर्वी २० डिसेंबर २०१९ मध्ये अंडर १४ इंटर झोनल टुर्नामेंटमध्ेय व्हाईट प्रेसिडेंट इलेवनकडून खेळताना धारवाड झोन विरूद्ध २०१ धावा करून सर्वांची प्रशंसा मिळवली होती. 

समित द्रविड आपल्या ऑल राऊंड कामगिरीमुळेही गेल्या वर्षी चर्चेत होता. त्याने इंटर झोनल टुर्नामेंटमध्ये ३ विकेट आणि २ डावात एकूण २९५ धावा केल्या होत्या.  

यापूर्वी समित २०१६ मध्ये चर्चेत आला होता. त्याने बंगळुरू युनायटेड क्रिकेट क्लबकडून खेळताना फ्रँक एंथोनी पब्लिक स्कूल विरूद्ध १२५ धावा केल्या होत्या. समितने प्रत्युष जी (१४३) सोबत चौथ्या विकेटसाठी २१३ धावांची खेळी केली होती. त्याच्या टीमने ३० ओव्हरच्या सामन्यात लोयोला स्कूल मैदानावर २४६ धावांनी शानदार विजय मिळवला होता. 

असे वाटत आहे की समित आपल्या वडिलांच्या पदचिन्हावर चालत आहे. राहुल द्रविड याची जगातील मोठ्या फलंदाजांमध्ये गणना होते. १६ वर्षांच्या शानदार करिअरमध्ये राहुल द्रविड याने १३ हजार २८८ टेस्ट आणि १० हजार ८८९ वन डे धावा केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी