Rahul Dravid VIDEO: जेव्हा द्रविडने 'Sexy' शब्द बोलण्यापासून स्वतःला रोखलं अन्...

Rahul Dravid avoid using a word in press conference: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सगळ्यांनाच खूप हसवलं. त्याने एक शब्द बोलण्याचा इशारा केला, परंतु स्वत: तो शब्द बोलणं टाळलं. ज्यानंतर त्याचा हा व्हीडिओ खूपच व्हायरल झाला.

rahul dravid stopped himself from saying word sexy see how he got confused laughed viral video
Video: द्रविडने 'Sexy' शब्द बोलण्यापासून स्वतःला रोखलं अन्..  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामना
  • कोव्हिड-19 मधून बरा झाल्यानंतर राहुल द्रविड पुन्हा भारतीय संघासोबत
  • राहुल द्रविडचा एक भन्नाट व्हीडिओ होतोय व्हायरल

Rahul Dravid: दुबई : आशिया चषकाच्या (Asia Cup) सुपर-4 मध्ये आज (4 सप्टेंबर) दुबईत (Dubai) भारतीय संघाचा (Team India) सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan) होणार आहे. गेल्या आठवड्यात जेव्हा दोन्ही संघांमध्ये लढत झाली तेव्हा सामना खूपच रोमहर्षक झाला होता. भारतीय संघाने हा सामना 5 विकेटने जिंकला होता. आज भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना पुन्हा एकदा चुरशीचा होणार असल्याची चाहत्यांना आशा आहे. (rahul dravid stopped himself from saying word sexy see how he got confused laughed viral video )

मात्र, मागील सामन्यात भारतीय संघाची टॉप ऑर्डर पाकिस्तानी गोलंदाजांसमोर झुंजत असल्याचं दिसून आलं होतं. केएल राहुल आणि रोहित शर्मा हे लवकर बाद झाले होते. तर विराट कोहलीला देखील सुरुवातीलाच जीवदान मिळाले होते. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या गोलंदाजीचे कौतुक करताना भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत एक मजेदार गोष्ट केली.

अधिक वाचा: Virat Kohali : जाडेजाबद्दलच्या या निर्णयायंतर विराटने जोडले हात आणि देवाचे मानले आभार, व्हिडीओ व्हायरल

राहुल द्रविड म्हणाला, 'तुम्हाला त्यांच्या गोलंदाजी आक्रमणाचा आदर केला पाहिजे आणि मला विश्वास आहे की आमच्याकडेही उत्कृष्ट गोलंदाजी आक्रमण आहे. मला एक शब्द वापरायचा आहे पण तो वापरता येत नाही.' 

त्यामुळे पत्रकारांनी काही शब्द सुचविण्यास सुरुवात केली.  त्यानंतर द्रविड म्हणाला की, 'हा चार अक्षरी शब्द आहे, ज्याची सुरुवात S ने होते.' द्रविडच्या या बोलण्याने तिथे उपस्थित सर्वजण खूप हसले.

अधिक वाचा: गेम फिनिशर Hardik pandyaवर मोठं-मोठे Brand फिदा; जाहिरातीसाठी दिवसाला चार्ज करणार इतके कोटी

यादरम्यान पत्रकाराशी बोलताना द्रविडने विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल सांगितले. 'लोक त्याचे आकडे आणि नंबरबाबत खूप उत्कट आहेत. भारतीय संघाचे लक्ष विराट कोहलीकडे आहे की, तो डावाच्या वेगवेगळ्या टप्प्यात कसे योगदान देऊ शकतो.' 

द्रविड पुढे म्हणाला की, 'तो किती धावा करतोय याने आम्हाला काही फरक पडत नाही. विशेषत: विराट कोहलीचे आकडे आणि नंबर्स याचे लोकांना जास्त वेड आहे. खेळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तो किती योगदान देऊ शकतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. इथे अर्धशतक किंवा शतकाची विचार होत नाही. तर टी-20 मध्ये छोटे-छोटे योगदान देखील महत्त्वाचं ठरतं.' असं म्हणत राहुल द्रविडने विराट कोहलीची पाठराखण केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी