IND vs AUS 2nd ODI : विशाखापट्टणममधील वन डे मॅचला पावसाच्या व्यत्ययाचा धोका

rain likely to wash out visakhapatnam India vs Australia match : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वन डे मॅचच्या सीरिजमधील दुसरी मॅच विशाखापट्टणम येथे होणार आहे. या मॅचवर पावसाचे सावट आहे.

rain likely to wash out visakhapatnam India vs Australia match
विशाखापट्टणममधील वन डे मॅचला पावसाच्या व्यत्ययाचा धोका  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • विशाखापट्टणममधील वन डे मॅचला पावसाच्या व्यत्ययाचा धोका
  • भारताने पहिली वन डे पाच विकेट राखून जिंकली
  • विशाखापट्टणम मॅच नंतर चेन्नईत सीरिजची शेवटची मॅच

rain likely to wash out visakhapatnam India vs Australia match : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वन डे मॅचच्या सीरिजमधील दुसरी मॅच विशाखापट्टणम येथे होणार आहे. या मॅचवर पावसाचे सावट आहे.

भारताने पहिली वन डे पाच विकेट राखून जिंकली. आता सलग दुसरी वन डे जिंकून भारताचा प्रयत्न सीरिज 2-0 अशी खिशात टाकण्याचा आहे. पण विशाखापट्टणमच्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. 

पावसामुळे मॅच उशिरा सुरू होईल किंवा पाऊस पडल्यामुळे काही वेळासाठी मॅच थांबवावी लागेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे मॅचच्या काही ओव्हर कमी कराव्या लागतील असाही अंदाज आहे. पण पावसामुळे पूर्ण मॅच रद्द होण्याची शक्यता नाही, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. 

विशाखापट्टणममध्ये रविवार 19 मार्च 2023 रोजी पावसाची शक्यता 31 ते 51टक्के आहे. मॅचचे भवितव्य पावसावर अवलंबून आहे. विशाखापट्टण नंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नईत सीरिजमधील शेवटची वन डे मॅच होणार आहे.

भारत : शुभमन गिल, रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक / जयदेव उनाडकट 

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), अॅलेक्स केरी (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, सीन अॅबॉट, मिशेल स्टार्क, अॅडम झम्पा

बिर्याणीचे हे प्रकार माहिती आहेत का?

एप्रिल महिन्यात फिरण्याची भारतातील उत्तम ठिकाणे

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

  1. गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 ते सोमवार 13 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली टेस्ट, विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नागपूर - भारत 1 डाव आणि 132 धावांनी विजयी
  2. शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी टेस्ट, अरुण जेटली स्टेडियम दिल्ली - भारत 6 विकेट राखून विजयी
  3. बुधवार 1 मार्च 2023 ते रविवार 5 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी टेस्ट, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम धरमशाला - ऑस्ट्रेलिया 9 विकेट राखून विजयी
  4. गुरुवार 9 मार्च 2023 ते सोमवार 13 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी टेस्ट, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद - ड्रॉ/अनिर्णित
  5. शुक्रवार 17 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली वन डे, वानखेडे स्टेडियम मुंबई - भारत 5 विकेट राखून विजयी
  6. रविवार 19 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी वन डे, डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए - व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम - दुपारी 2
  7. बुधवार 22 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी वन डे, एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई - दुपारी 2

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी