AFG vs IRE: पावसाने धुतला गेला सामना, दोन्ही संघांना दिले पॉईंट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 28, 2022 | 13:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Afghanistan vs Ireland Match: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात टी20 वर्ल्ड कपचा सामना शुक्रवारी पावसाची भेट दिली. यामुळे दोन्ही संघांना 1-1 पॉईंट दिला आहे. 

afganistan vs reland
पावसाने धुतला गेला सामना, दोन्ही संघांना दिले पॉईंट 
थोडं पण कामाचं
  • अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने सामना न झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली.
  • आयर्लंडचे आता तीन सामन्यांतून 3 अंक झाले आहेत.
  • अँड्र्यू बालबिर्नीच्या नेतृत्वात टीम सुपर 12 ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

मुंबई: मेलबर्नमध्ये(melbourne) पावसाच्या व्यत्ययामुळे अफगाणिस्तान(afganistan) आणि आयर्लंड(ireland) यांच्यात टी20 वर्ल्ड कप(t-20 world cup 2022) सामना खेळवला जाऊ शकला नाही. शुक्रवारी होणाऱ्या या सामन्यात टॉसही झाला नाही. सातत्याने होणाऱ्या पावसामुळे सामना रद्द करावा लागला. यामुळे दोन्ही संघाना 1-1 गुण देण्यात आला. अफगाणिस्तान आणि आयर्लंड, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सामना न झाल्यामुळे निराशा व्यक्त केली. rain washed out afganistan vs ireland match in t-20 world cup 2022

अधिक वाचा - Video: लग्न मंडपात नववधू अन् नवरदेवाने केलं असं काही की...

इंग्लंडच्या वर पोहोचला आयर्लंड

आयर्लंडचे आता तीन सामन्यांतून 3 अंक झाले आहेत. अँड्र्यू बालबिर्नीच्या नेतृत्वात टीम सुपर 12 ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. टॉपवर असलेल्या सध्या न्यूझीलंडचे 3 अंक आहेत. मात्र त्यांचा नेट रनरेट आयर्लंडपेक्षा चांगला आहे. तिसऱ्या स्थानावर श्रीलंका, चौथ्या स्थानावर इंग्लंड, पाचव्या स्थानावर अफगाणिस्तान आणि शेवटच्या नंबरवर ऑस्ट्रेलिया आहे. सर्वांचे 2-2 पॉईंट आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात भारतीय वेळेनुसार  1:30 वाजल्यापासून सामना सुरू होणार आहे. 

नबीने व्यक्त केली निराशा

अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने सामना न झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली. इतक्या शानदार मैदानावर सामना न झाल्याने निराश झालोय. मी आणि रशीदने मेलबर्नमध्ये  खूप सारे बीबीएलचे सामने खेळले आहेत. आमचा संघ अधिकतर खेळाडू खेळण्याची वाट पाहत आहेत. 

अधिक वाचा - व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे शरीराचा होतो 'सांगडा'

झिम्बाब्वेने पाकला हरवले

झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानचा धक्कादायक पराभव झाला. अटीतटीच्या आणि चुरशीच्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर पराभूत केलं. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पाकिस्तानने झिम्बाब्वेला 129 धावांवरच रोखलं.  या सामन्यात पाकिस्तानला जिंकायला 130 धावांची आवश्यकता होती. पण झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी  जबरदस्त कामगिरी करताना पाकिस्तानला फक्त 128 धावांवरच रोखलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी