World Cup 2019: पावसामुळे तीन सामने रद्द, आता यापुढे असणार खास नियम 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 12, 2019 | 19:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे व्यत्यय निर्माण झाल्याने आता आयसीसीने इतर सामन्यांसाठी आता काही नवीन नियम लागू केले आहेत. जाणून घेऊ या असे कोणते नियम जे संघांना पावसामुळे वाचवू शकतात. 

team india
टीम इंडिया  

लंडन  :  आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ मध्ये १० संघासोबत ११ वा पाऊसही खेळ खेळतानाही दिसत आहे. आतापर्यंत १६ पैकी ३ सामने पावसामुळे वाहून गेले आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासात हे सर्वाधिक आहेत. यंदा वर्ल्ड कप हा राउंड रॉबिन पद्धतीने खेळण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक सामना हा प्रत्येक संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. अशात सामने रद्द झाल्याने अनेक चांगल्या संघांच्या वाटचालीत अडचणी निर्माण होत आहे.  स्पर्धेत पावसामुळे अडचणी निर्माण होत असल्याने आयसीसीने आता हस्तक्षेप केला आहे आणि उर्वरित सामन्यांसाठी काही खास नियम लागू केले आहेत. जाणून घेऊ या कोणते नवीन नियम लागू करण्यात आले आहेत, त्यामुळे पाऊस जरी पडला तरी संघाना फायदा होऊ शकतो. 

बदल झालेले नियम 

१) सुपर ओव्हर :  वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा सुपर ओव्हरही आपण पाहू शकतो, पण सुपर ओव्हर सेमी फायनल आणि फायनलमध्ये पाहता येणार आहे. जर सेमीफायनलमध्ये मॅच सुपर ओव्हरनंतरही टाय झाला तर हवामानामुळे एक रिझर्व डे किंवा सुपर ओव्हर खेळवता आले नाही तर लीग स्टेजमध्ये जो संघ वरच्या स्थानावर होता, त्याला विजेता घोषित करण्यात येईल. 

२) कसे ठरणार टॉप ४ संघ  - जे संघ लीग स्टेजमध्ये सर्वात जास्त सामने जिंकतील ते पॉइन्ट्स टेबलमध्ये टॉपवर असणार आहेत. दर दोन्ही संघाचे समान अंक असती तर नेट रन रेटवर निर्णय घेण्यात येणार आहे. जर नेट रन रेटही समान असेल तर लीग स्टेजमध्ये खेळवण्यात सामन्यात ज्या संघाने विजय मिळवला. जर यातही निर्णय बरोबरीत सुटला तर वर्ल्ड कपमधील टीमच्या सीडिंगवर सर्वात वरच्या स्थानावरील संघाला विजयी घोषीत करण्यात येईल. 

टीमची आयसीसी सीडिंग

  1. दक्षिण आफ्रिका
  2. भारत
  3. ऑस्ट्रेलिया
  4. न्यूझीलंड
  5. पाकिस्तान
  6. बांग्लादेश
  7. श्रीलंका 
  8. वेस्ट इंडिज 
  9. अफगाणिस्तान 

३ रिझर्व डे - वर्ल्ड कपच्या सेमी फायनल आणि फायनल सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास एक रिझर्व डे ठेवण्यात आला आहे.  या आधीच्या कोणत्याही लीग सामन्यात रिझर्व डे ठेवण्यात आला नाही. 

४ सेमी फायनलमध्ये पाऊस - या वर्ल्ड कपमध्ये लीग सामन्यानंतर लगेच सेमी फायनल खेळविण्यात येणार आहे. पण लीग सामन्यात जो संघ टॉपवर आहे त्याला फायनलसाठी क्वालिफाय करण्यात येणार आहे. 

५ फायनलमध्ये पाऊस - जर फायनल सामन्यात पावसाने गोंधळ घातला तर एक रिर्झव डे आहे. तसेच एक सुपर ओव्हरचाही पर्याय आहे. पण तरीही सामन्याचा निकाल लागला नाही तर दोन्ही संघाना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup 2019: पावसामुळे तीन सामने रद्द, आता यापुढे असणार खास नियम  Description: वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे व्यत्यय निर्माण झाल्याने आता आयसीसीने इतर सामन्यांसाठी आता काही नवीन नियम लागू केले आहेत. जाणून घेऊ या असे कोणते नियम जे संघांना पावसामुळे वाचवू शकतात. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola