cricket stories । मुंबई : मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भोसले क्रिकेट अकादमीने एकतर्फी जीपीसीसी संघाचा १०५ धावांनी विजय मिळविला आहे.
अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १२ स्पर्धेचे आयोजन करतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्पर्धा झाल्या नाही. यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने छोट्या स्पर्धा सर्व मार्गदर्शक नियम पाळून घेण्याची परवानगी मिळाली.
भोसले क्रिकेट अकादमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना २२ षटकात १ बाद १९५ धावा केल्या. भोसले क्रिकेट अकादमीकडून अर्जुन लोटलीकर याने सर्वाधिक ९१ धावा केल्या. यात त्याने १६ चौकार लगावले. देवांश त्रिवेदी याने ५७ चेंडूत ७४ धावा केल्या.
भोसले क्रिकेट अकादमीच्या १९५ धावांचा पाठलाग करताना जीपीसीसी संघ ९० धावांवर गारद झाला. मॅथन मिस्त्रीने ३.४ षटकात १८ धावात देत ४ विकेट घेतल्या. अर्णव लाड याने ४ षटकात २ मेडन २ धावा देत २ विकेट घेतल्या. तर स्वयंम वामने याने ३ विकेट घेतल्या.
दुसऱ्या एका सामन्यात एसएम स्पोर्टस २२ षटकात सर्व बाद १०८ धावा केल्या. या छोट्या धावांचा पाठलाग करताना डीसीए संघ ७८ धावात गारद झाला. एसएम स्पोर्ट्स कडून सर्वाधिक २१ धावा निखिल गुरवने केल्या. तर वेदांग कोकाटे याने १९ धावा केल्या.
तर डीसीएकडून अब्दुल याने सर्वाधिक २८ धावा केल्या. निखील गुरव यावे पाच षटकात ४ विकेट घेतल्या. वेदांग कोकटे याने तीन विकेट घेतल्या.