83 Movie Teaser: रणवीर, दीपिकाच्या '83' सिनेमाचा दमदार टीझर रिलीज

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 26, 2021 | 13:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

83 Movie Teaser release: रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण (Ranveer Singh And Deepika Padukone) यांचा आगामी सिनेमा 83चा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये ऐतिहासिकक्षणाची झलक पाहायला मिळत आहे. 

83 movie
रणवीर, दीपिकाच्या 83 सिनेमाचा दमदार टीझर रिलीज 
थोडं पण कामाचं
  • बहुप्रतिक्षित सिनेमा 83चा टीझर अखेर रिलीज झाला आहे.
  • टीझर पाहिल्यानंतर १९८३च्या वर्ल्डकपच्या आठवणी नक्कीच पुन्हा जाग्या होतील
  • टीझरसोबतच या सिनेमाची रिलीज तारीखही समोर आली आहे.

मुंबई: रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 83(83 movie)चा टीझर अखेर रिलीज झाला आहे. याचा टीझर(teaser) दमदार आहे. टीझर पाहिल्यानंतर १९८३च्या वर्ल्डकपच्या(1983 world cup) आठवणी नक्कीच पुन्हा जाग्या होतील. टीझरसोबतच या सिनेमाची रिलीज तारीखही(release date) समोर आली आहे. नुकतेच दीपिका पदुकोणने आपल्या इन्स्टाग्रामवर सिनेमाचा टीझर शेअर करण्यासोबतच रिलीज डेटचाही खुलासा केला होता. दीपिकाचा हा सिनेमा हिंदीशिवाय तेलुगु, तामिळ आणि मल्याळम भाषेतही रिलीज होत आहे. Ranveer singh, Deepika padukone starrer 83 Movie teaser release

दीपिका पदुकोणने इन्स्टागरामवर या सिनेमाचा टीझर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, भारताच्या सगळ्यात मोठ्या विजयामागची कहाणी. यासोबतच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. रणवीर आणि दीपिकाचा हा सिनेमा यावर्षी २४ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत आहे. सिनेमाचा टीझर अनेकांच्या पसंतीस उतररत आहे. सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर १९८३च्या वर्ल्डकपच्या आठवणी ताज्या होतात. यावेळेस कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा वर्ल्डकपवर आपले नाव कोरले होते. 

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण स्टाटर  83 सिनेमाचा ट्रेलर ३० नोव्हेंबरला रिलीज होत आहे. तर सिनेमा २४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात रणवीर सिंह कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका पदुकोणने कपिल देवची पत्नी रोमी देवची भूमिका साकारली आहे. लग्नानंतर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा एकत्रित पहिला सिनेमा असणार आहे. १९८३ मध्ये कपिल देव भारतीय संघाचे कर्णधार होते. 

83च्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित सिनेमा

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा हा सिनेमा १९८३मध्ये झालेल्या वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाच्या कहाणीवर आधारित आहे. त्यावेळेस भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव होते. सिनेमात रणवीर सिंह आणि दीपिकाशिवाय ताहीर राज भसीन, साकिब सलीम, एमी वीर्क, हार्डी सिंध, पंकज त्रिपाठीसारखे कलाकारही आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी