IND vs AFG:भारताविरुद्धच्या सामन्याआधी रशीद खानने देशवासियांना केले खास अपील, पाहा व्हिडिओ 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 03, 2021 | 17:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 WC IND vs AFG: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ३ नोव्हेंबरला सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाला काही करून हा सामना मोठ्या फरकाने जिंकावाच लागे तेव्हा सेमीफायनलमध्ये त्यांच्या खेळण्याच्या आशा थोड्याफार जिवंत राहू शकतात. 

rashid khan
भारताविरुद्धच्या सामन्याआधी रशीद खानचे देशवासियांना आवाहन 
थोडं पण कामाचं
  • भारताविरुद्धच्या सामन्याआधी रशीद खानचे खास अपील
  • आपल्या देशवासियांना गोंधळ न करण्याचे आवाहन
  • सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

दुबई: आज टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup) भारताचा(india) तिसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध(afganistan) होत आहे. भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना मोठ्या फरकाने जिंकावाच लागेल. तेव्हा सेमीफायनलमध्ये(semifinal) खेळण्याच्या आशा काही प्रमाणात जिवंत राहू शकतात. मात्र भारताचा प्रवास हा काही सोपा असणार नाही. भारताविरुद्धच्या सामन्याआधी रशीद खानने आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे.rashid khan appeal to fans via social media

खरंतर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादमरम्यान, अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी स्टेडियमच्या बाहेर खूप गोंधळ घातला होता. यानंतर आयसीसीने हे प्रकरण गंभीरतेने घेत याची चौकशी सुरू केली होती. 

अफगाणिस्तानचा क्रिकेटर रशीद खानने भारताविरुद्धच्या सामन्याआधी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने चाहत्यांना आवाहन केले आहे. त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, उद्याच्या म्हणजेच ३ नोव्हेंबरच्या AFGvIND सामन्याबाबत खूप उत्साहित आहे. गेल्या आठवड्यात आम्ही निराशा केली. आम्हाला आपला राष्ट्रध्वज फडकवण्याची आणि आपल्या देशाला गौरवांकित कऱण्याची गरजआहे. कृपा करून नियमांचा सन्मान करा आणि आयोजकांना पाठिंबा द्या. केवळ तिकीट घेऊन स्टेडियममध्ये या. 

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचे काही चाहते विना तिकीट स्टेडियममध्ये घुसले होते. याकारण तिकीट घेतलेले काही चाहते सामना पाहू शकले नव्हते यानंतर आयसीसीने तपासाचे आदेश दिले होते. 

रशीद खानपासून भारताने रहावे सावध

भारताचा फलंदाज सध्या स्पिनर्सविरुद्ध सरासरीने खेळ आहेत. याचा फायदा रशीद खान आणि मुजीब उर रहमान उचलू शकतात. रशीद आणि मुजीब आपल्या फिरकी गोलंदाजीने कमाल करत आहेत. रशीदने आतापर्यंत ७ विकेट घेतलेत. तर मुजीने ६ विकेट मिळवल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी