मुंबई: अवघ्या काही दिवसांवर आशिया कप २०२२(asia cup 2022) स्पर्धा येऊन ठेपली आहे. त्याआधी रशीद खान(rashid khan) जबरदस्त फॉर्मात आहे. ३ सामन्यांआधी चित्र काही वेगळे होते. माज्ञ आता अफगाणी पठाण बदललेला दिसत आहे. तो सातत्याने विकेट काढत आहे. संपूर्ण संघ गारद करताना तो नुकसान पोहोचवत आहे. कमीत कमी गेल्या तीन सामन्यांमध्ये हे होत आहे. याचे ताजे उदाहरण इंग्लंडमध्ये खेळवल्या जात असलेल्या १०० बॉलची टूर्नामेंट द हंड्रेडमध्ये(the hundred) पाहायला मिळाले. येथे रशीद खान एकापाठोपाठ एक विकेट घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हे सर्व त्याने २० बॉलमध्ये केले. Rashid khan bowling in hundred series
अधिक वाचा - विनायक मेटेंच्या अपघाताविषयी पुढे आली महत्त्वाची माहिती
हा सामना रंगला होता ट्रेंट रॉकेट्स आणि लंडन स्प्रिट यांच्यात. या सामन्यात रशीद खान ट्रेंट रॉकेट्ससाठी खेळत होता. हा द हंड्रेडच्या या हंगामातील रशीद खानचा पहिला सामना होता. मात्र जेव्हा तो मैदानावर उतरला तेव्हा असे वाटले की जेव्हा आयर्लंडमध्ये हरवलेला फॉर्म परत मिळवल्यानंतर विकेट घेण्याचे काम मागे टाकले होते. तेथूनच द हंड्रेडमध्ये सुरू केले.
रशीद खानने ट्रेंट रॉकेट्सकडून लंडन स्प्रिटविरुद्ध केवळ २० बॉल फेकले. या २० बॉलमध्ये ८ बॉल डॉट टाकले. यात त्याने २५ धावा दिल्या आणि ३ विकेट मिळवल्या. यात कायरन पोलार्डच्या विकेटचाही समावेश होता. पोलार्डशिवाय रशीदने डॅन लॉरेन्स आणि जॉर्डन थॉम्प्सनचीही विकेट घेतली. कमालीची बाब म्हणजे या तीनही विकेट त्याने क्लीन बोल्ड करत घेतल्या.
अधिक वाचा - हात पाय बांधून मजुरांना बेदम मारहाण, पहा घटनेचा व्हिडीओ
रशीद खान गेल्या ३ सामन्यांत सलग विकेट घेत आहे. त्याआधी तो थोडासा फॉर्मशी झगडताना दिसत होता. त्याला एक एक विकेट घेण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र गेल्या ३ सामन्यांत असे झाले नाही. द हंड्रेडमध्ये उतरण्याआधी आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत शेवटच्या दोन सामन्यांतही त्याने ३ विकेट मिळवल्या होत्या. यावरून स्पष्ट आहे की रशीद खानचे या प्रकारच्या फॉर्ममध्ये येणे जिथे अफगाणिस्तानसाठी चांगले आहे तर या स्पर्धेत दुसरीकडे भारतासह दुसऱ्या संघांसाठी घातक आहे.