रशीद खानला खूप आवडतो विराट कोहलीचा हा गुण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 07, 2021 | 18:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rashid Khan on Virat Kohli: ऱशीद खानला विराट कोहलीच्या फलंदाजीतील एक गुण पसंद आहे. त्याचे म्हणणे आहे की कोहली तो शॉट कधीच खेळत नाही जो त्याची ताकद नाही. 

rashid khan and virat kohli
रशीद खानला खूप आवडतो विराट कोहलीचा हा गुण 

थोडं पण कामाचं

  • रशीद खानने विराट कोहलीची स्तुती केली आहे.
  • रशीदने म्हटले की कोहली कधीच त्रस्त होत नाही.
  • स्पिनरसोबत रोहितचीही स्तुती केली.

अबुधाबी:  अफगाणिस्तानचा लेग स्पिनर रशीद खानने(afganistan leg spinner rashid khan) म्हटले की भारतीय कर्णधार विराट कोहली(virat kohli) यासाठी खास आहे कारण तो दबावातही आपला स्वाभाविक शॉट खेळतो. सोबतच तो म्हणाला की कोहली कधीही असा शॉट खेळत नाही जी त्याची ताकद नाही. आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या रशीदने म्हटले की रोहित शर्मा(rohit sharma) स्वाभाविकपणे चांगला फलंदाज आहे आणि त्याचे अनेक प्रकारचे शॉट आहेत.(rashid khan likes this quality of virat kohli ) 

विराट कोहली डोक्याने खेळतो

रशीदने यूट्यूब चॅनेलवर म्हटले की जर एखादा फलंदाज आहे आणि जर तुम्ही त्याला चांगली गोलंदाजी करत असाल तर तो दबावात येईल. यात तो असे शॉट खेळेल जे त्याची ताकद नाही जसे की स्वीप, स्लॉग स्वीप आणि इतर स्ट्रोर. मात्र विराट कोहली असे करत नाही. तो नेहमी आपल्या डोक्याने खेळतो. 

कोहलीकडे भरपूर आत्मविश्वास

तो पुढे म्हणाला, फलंदाजी करण्याची त्याची वेगळीच शैली आहे. तो वेगळं काही करत नाही. मला वाटते त्यासाठीच तो यशस्वी आहे. तो चांगल्या बॉलला सन्मान देतो. मात्र सोबत खराब चेंडूंना शिकवतो. त्याच्याकडे भरपूर आत्मविश्वास आहे. काही फलंदाजांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. त्यामुळे ते संघर्ष करतात.मात्र विराटला आपल्या ताकदीबद्दल माहिती आहे. 

रोहित शर्मा जसे पुल करतो...

मला वाटते की रोहितकडे पुरेसा वेळ आहे. मी असे फार कमी खेळाडू बघितलेत ज्यांच्याकडे खूप वेळ असतो. काही खेळाडूंकडे अधिक वेळ असे स्वाभाविक असते. तो ज्या पद्धतीने १४५ अथवा १५० किमी प्रती तास वेगाने पुल करतो, तो ज्या पद्धतीने हिट करतो असे वाटते की बॉल १२५ अथवा १३० किमी प्रती तास वेगाने येत आहे. तो खूप शक्तीशाली शॉट खेळत नाही. त्याला आपल्या टायमिंगवर विश्वास आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी