मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या 'या' खेळाडूवर दोन वर्षांची बंदी, BCCI ने घेतला निर्णय

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 19, 2019 | 23:50 IST | टाइम्स नाऊ हिंदी

बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमकडून खेळणाऱ्या बॉलरवर बीसीसीआयने दोन वर्षांची बंदी घातली आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...

rasikh salam banned two years by bcci
बीसीसीआय  |  फोटो सौजन्य: IANS

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने बुधवारी जम्मू आणि काश्मीरचा फास्ट बॉलर रासिख सलाम याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. वयचोरी प्रकरणात दोषी आढळल्याने रासिख सलाम याच्यावर बीसीसीआयने ही कारवाई केली आहे. आयपीएल २०१९च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये  रासिख सलाम याला खेळण्याची संधी मिळाली होती.

या प्रकरणी बीसीसीआयने एक स्टेटमेंट प्रसिद्ध करत म्हटलं की, इंग्लंडमध्ये २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या अंडर-१९ भारतीय क्रिकेट टीममध्ये रासिख याच्या ऐवजी आता प्रभात मौर्या याला संधी दिली आहे. राष्ट्रीय कनिष्ठ निवड समितीने २१ जुलै पासून इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या अंडर-१९ क्रिकेट टीममधून रासिखला वगळलं आहे. आता रासिखच्या ऐवजी प्रभात मौर्या याची निवड करण्यात आली आहे. रासिख सलाम याने बनावट कागदपत्र जमा करत वयचोरी केल्याने त्याच्यावर बीसीसीआयने दोन वर्षांची बंदी घातली आहे.

Rasikh Salam

रासिख सलाम (फोटो सौजन्य: IANS)

भारताची अंडर-१९ क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी रासिख सलाम याची ९ जून रोजी अंडर-१९च्या टीममध्ये निवड करण्यात आली होती. या दौऱ्यात भारतीय अंडर-१९ टीम तीन मॅचेसची वन-डे सीरिज खेळणार आहे. 

वय चोरी प्रकरण नेमकं काय?

वयचोरी करुन अनेकदा खेळाडू टीममध्ये सहभागी होतात मात्र, ही खूपच गंभीर बाब असल्याने अशा खेळाडूंवर कारवाई करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. यानुसार खेळाडूवर एका वर्षाची बंदी घालण्याची शिक्षा होती. मात्र, गेल्यावर्षी बीसीसीआयने या शिक्षेत वाढ करुन दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या नव्या नियमानुसार आता रासिख सलाम याच्यावर दोन वर्षांची बंदी बीसीसीआयने घातली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या 'या' खेळाडूवर दोन वर्षांची बंदी, BCCI ने घेतला निर्णय Description: बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमकडून खेळणाऱ्या बॉलरवर बीसीसीआयने दोन वर्षांची बंदी घातली आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola