IND vs WI: टीम इंडियामधील निवडीसाठी रवी बिश्नोईने या दिग्गजाला दिले श्रेय

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 27, 2022 | 19:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

ravi bishnoi: लेग स्पिनर रवी बिश्नोई २०२० अंडर १९ वर्ल्डकपनंतर चमकला आहे. त्या स्पर्धेत तो सर्वाधिक विकेट घेणारा फलंदाज होता. २०२०मध्ये आयपीएलमध्ये मुंबईशी भांडून पंजाबने २ कोटींना त्याला खरेदी केले होते. 

ravi bishnoi
टीम इंडियामधील निवडीसाठी रवी बिश्नोईने दिले यांना श्रेय 
थोडं पण कामाचं
  • रवी बिश्नोईची टीम इंडियामध्ये निवड
  • या निवडीसाठी अनिल कुंबळेला दिले श्रेय
  • रवीला लखनऊ सुपरजायंटने आपल्या संघात सामील केलेय

मुंबई: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिकेसाठी युवा लेग स्पिनर रवी बिश्नोईला संघात निवडण्यात आले आहे. त्याला नुकतेच आयपीएलची नवी फ्रेंचायजी लखनऊ सुपरजायंटने आपल्या संघात सामील केले होते. २१ वर्षीय बिश्नोईने टीम इंडियामध्ये निवड होण्याचे श्रेय माजी दिग्गज लेग स्पिनर आणि पंजाब किंग्सचे कोच अनिल कुंबळेला दिले आहे. बिश्नोई या हंगामात आयपीएलमध्ये दोन वर्षे पंजाब किंग्स संघात राहिला आहे. Ravi bishnoi gives credit to anil kumble for selection in team india

कुंबळेमुळे चांगला खेळाडू बनू शकला रवी

रवी बिश्नोईने सांगितले की तो कशा पद्धतीने कुंबळेमुळे एक चांगला खेळाडू बनू शकला. एका स्पोर्ट्स वेबसाईटशी बोलताना त्याने सांगितले, मी अनिल सरांकडून खूप काही शिकलो आहे. त्यांच्यामुळेच मी एक चांगला क्रिकेटर बनू शकलो. ते मला नेहमी गाईड करत असतं आणि कशा प्रकारे मी स्वत:ची मदत केली पाहिजे हे ही सांगत. अनिल सरांनी मला दबावात आल्यानंतरही आशा न सोडण्यास शिकवले. या गोष्टी माझ्या खूप कामी आल्या. 

अधिक वाचा - घरबसल्या 2 रुपयांच्या या नाण्यातून कमवा 5 लाख रुपये

कुंबळेमुळे रवीला मिळाला आत्मविश्वास

रवीने सांगितले, अनिल सरांनी मला नेहमी माझ्यातील मजबूत गोष्टींच्या आधारावर खेळण्यास शिकवले. मी नेहमी माझ्या बेसिक्सवर लक्ष दिले पाहिजे आणि प्लाननुसार गोलंदाजी केली पाहिजे हे मला शिकवले. अनिल कुंबळे यांनी मला माझ्या गोलंदाजीत प्रयोग न करण्याचाही सल्ला दिला. 

अधिक वाचा - अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर सोने घसरले

बिश्नोई अंडर १९ वर्ल्डकप २०२०मध्ये चमकला होता

लेग स्पिनर रवी बिश्नोई अंडर १९ वर्ल्डकप २०२०मध्ये चमकला होता. त्या स्पर्धेत तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. २०२०मध्ये आयपीएलमध्ये मुंबईशी लढून पंजाबने रवीला २ कोटींना विकत घेतले होते. तोआपल्या हंगामात पंजाबसाठी सर्वाधिक विकेट घेणारा लेग स्पिनर ठरला होता. तो आपल्या पहिल्या हंगामात पंजाबकडून सर्वाधिक विकेट घेणारा स्पिनर ठरला होता. त्याने १४ सामन्यांमध्ये १२ विकेट घेतल्या. तर आयपीएल २०२१मध्ये रवीच्या नावावर ९ सामन्यांमध्ये १२ विकेट होत्या. या लीगमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ६.९५ इतका होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी