Ravi shastri: रवी शास्त्रींचे विधान, वर्ल्डकप जिंकण्यावरून खेळाडूंना जज करू नका

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 25, 2022 | 18:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ravi shastri statement: टीम इंडिया (Team India) चे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात भारताने परदेशात चांगली कामगिरी केली. संघाने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या कसोटी मालिकाही जिंकली. मात्र ते भारताला आयसीसी ट्रॉफी मिळवून देऊ शकले नाहीत. 

ravi shastri
'गांगुली, द्रविड,लक्ष्मण आणि कुंबळेने नाही जिंकला वर्ल्डकप' 
थोडं पण कामाचं
  • माजी कोच रवी शास्त्री यांचे मोठे विधान
  • वर्ल्डकप जिंकण्यावरून खेळाडूंना जज करू नका
  • सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे आणि रोहित शर्मा हेही वर्ल्डकप जिंकू शकलेले नाहीत

मुंबई: रवि शास्त्री (Ravi Shastri) नी टीम इंडियाच्या माजी दिग्गज खेळाडूंबद्दल विधान केले आहे. टीम इंडियाचे (Team India)  माजी कोच रवी शास्त्री यांनी टी-२० वर्ल्डकपनंतर(T20 World Cup 2021) आपले पद सोडले होते. त्यांच्या कार्यकाळात संघाने चांगली कामगिरी केली होती. टीमने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकाही जिंकली होती. त्यांची आणि विराटची जोडी हिट ठरली. मात्र कोहली एक कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाही. आता कोहली भारताच्या कोणत्याही फॉरमॅटचा कर्णधार नाही. त्याने काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-२ असा पराभव झाल्यानंतर कर्णधारपद सोडले होते. ravi shastri big statement about team india and players

अधिक वाचा -  घरात पूजा करत असताना सुनेकडून सासूची गोळ्या झाडून हत्या

रवी शास्त्रीने टीम इंडिया आणि खेळाडूंच्या प्रदर्शनाबाबत म्हटले, सांगा कोणता संघ दीर्घकाळ चांगली कामगिरी करूशकतो. गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठे मोठे खेळाडू वर्ल्डकप जिंकू शकलेले नाहीत. सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे आणि रोहित शर्मा हेही वर्ल्डकप जिंकू शकलेले नाहीत. याचा अर्थ असा होत नाही की ते खराब खेळाडू आहे. सचिन तेंडुलकरलाही वर्ल्डकप जिंकण्याआधी ६ वर्ल्डकप खेळावे लागले. 

कसोटी मालिकेत पराभव

टीम इंडियाला गेल्या काही दिवसांमध्ये द. आफ्रिकेतील कसोटी मालिकेत १-२ असा पराभव स्वीकारावा लागला. वनडे मालिकेत ०-३ असा पराभव पत्करावा लागला. दरम्यान, कोहलीच्या कार्यकाळादरम्यान संघ ५ वर्षांपर्यंत कसोटीत नंबर वन संघ होता. गेल्या काही दिवसांमध्ये कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. माजी दिग्ग सुनील गावस्कर यांनीही म्हटले होते की कोहलीचा याचेच भय होते की बोर्ड त्याच्याकडून कसोटीचे कर्णधारपदही घेऊ शकते. 

अधिक वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मिळणार 2 लाख रुपये

राहुल द्रविड नवे प्रशिक्षक

राहुल द्रविडला सध्या संघाचा प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. रोहित शर्माकडे भारताच्या वनडे आणि टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. आतापर्यंत नव्या कसोटी कर्णधाराची घोषणा झालेली नाही. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्डकप २०२२ होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी