BCCI ने हटवल्यानंतर रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट, काहींना मी टीम इंडियाचा कोच म्हणून नको होतो

ravi shastri revealed : टीम इंडियाशी आपला करार संपल्यानंतर रवी शास्त्री यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी केलेल्या संभाषणात अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. काही लोकांना मी प्रशिक्षक व्हावे असे वाटत नव्हते..अशी खंत रवी शास्त्रींनी व्यक्त केली.

 Ravi Shastri's assassination after BCCI deleted, some wanted me as coach of Team India
BCCI ने हटवल्यानंतर रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट, काहींना मी टिम इंडियाचा म्हणून कोच नको होतो ।  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाशी करार संपल्यानंतर रवी शास्त्री यांची मुलाखत
  • बीसीसीआयमधील लोकांवर आरोप
  • पुन्हा प्रशिक्षक होऊ नये यासाठी काही लोक सर्वतोपरी प्रयत्न करत होते

ravi shastri revealed मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या बदलाच्या काळातून जात आहे. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला टी-20 आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आला आहे. त्याआधी टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (ravi shastri) 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियापासून दूर करुन राहुल द्रविड (rahul dravid) यांच्या खात्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखती टीम इंडियाबाबत अनेक गौप्यस्फोट करुन खळबळ उडवली आहे. आपल्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाची आठवण करून देत शास्त्री यांनी काही लोकांना ते भारतीय संघाचा प्रशिक्षक (coach) बनू इच्छित नव्हते असा दावा केला आहे. (Ravi Shastri's assassination after BCCI deleted, some wanted me as coach of Team India)

बीसीसीआयशी करार संपल्यानंतर अनेक खुलासे

भारतासाठी 80 कसोटी आणि 150 एकदिवसीय सामने खेळलेले शास्त्री हे 1983 च्या विश्वविजेत्या संघाचे प्रमुख खेळाडू होते. सहा चेंडूत सहा षटकार ठोकणाऱ्या या अनुभवी खेळाडूने रिटायरमेंटनंतर समालोचन कारकीर्द सुरू केली. दरम्यान, 2017 मध्ये, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि VVS लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (CaC) त्यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले. आपला करार संपल्यानंतर रवी शास्त्री यांनी आमचे सहकारी टाइम्स ऑफ इंडियाशी केलेल्या संभाषणात अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.


मी प्रशिक्षक होण्यास तयार नव्हतो

2007, 2014, 2017... बर्‍याच प्रकारे, मला वाटले की, ही जबाबदारी घेऊन मी चूक करत आहे कारण मी तसे करण्यास तयार नव्हतो. 2012 ते 2014 दरम्यान परदेशात सलग पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेटची स्थिती चांगली नव्हती. 2014 मध्ये मी स्टारसोबत नवीन करार केला, तेव्हा बीसीसीआयने मला टीम इंडियाशी जोडण्यासाठी आमंत्रण पाठवले. तेव्हा पैशाची चर्चा नव्हती, सर्व काही तोंडी होते. पण मी जबाबदारी स्विकारली.

धोनीशिवाय मला फारसे कोणी ओळखत नव्हते.

मी टीव्हीवर खेळाडूंच्या मुलाखती घेतल्यामुळे संघातील एमएस धोनीशिवाय मला फारसे कोणी ओळखत नव्हते. सचिन-सौरव-राहुल-व्हीव्हीएस-अनिल हे सर्व निवृत्त झाले होते. अशा परिस्थितीत या संघाशी जोडणे माझ्यासाठी आव्हानापेक्षा कमी नव्हते. मी संघाचे नेतृत्व करू शकेल अशा खेळाडूच्या शोधात होतो. मी विराट कोहलीत ती सर्व गुण पाहिले. कोहली मैदानावर आणि मैदानाबाहेर एमएस धोनीची जागा घेण्यास तयार दिसत होता.

संघापासून दूर करण्याचे अनेक मार्ग

ज्या प्रकारे मला संघातून वगळण्यात आले ते खूप दुःखी आहे. ही पद्धत योग्य नव्हती. मला दूर करण्याचे आणखी चांगले मार्ग असू शकतात. माझ्या दुसऱ्या कार्यकाळात मी अनेक वादानंतर आलो. मला बाहेर ठेवू पाहणाऱ्यांना झटका बसला होता. बीसीसीआयमधील काही लोकांना मला आणि भरत अरुणला प्रशिक्षक म्हणून बघायचे नव्हते, त्याला गोलंदाजी प्रशिक्षक बनवायचे नव्हते, तो आज भारताचा सर्वोत्तम गोलंदाजी प्रशिक्षक झाला आहे. तो प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतो. मी कोणत्याही एका व्यक्तीकडे बोट दाखवत नाही. मी कोणाचेही नाव घेत नाही, पण हे निश्चित आहे की, मी प्रशिक्षक होऊ शकलो नाही, यासाठी काही लोक सर्वतोपरी प्रयत्न करत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी