Ravichandran Ashwin गोलंदाज आर. अश्विनचे टेस्ट क्रिकेटमध्ये अर्धशतक

R ashwin take 50 wickets in test भारताने दीड दिवसापेक्षा अधिक काळ खेळून सर्वबाद ३२५ धावा केल्या. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पाहुण्या न्यूझीलंडचा डाव ६२ धावांत आटोपला.

R ashwin take 50 wickets in test
न्युझीलंडविरोधात झालेल्या सामन्यात चार विकेट्स घेतले  
थोडं पण कामाचं
  • भारतीय टीम ३२५ धावांवर पूर्ण बाद झाली.
  • अश्विनने ८ ओव्हर्समध्ये ८ रन्स देऊन चार विकेट्स घेतल्या
  • न्युझीलंडला पूर्ण बाद करण्यात मोहम्मद सिराजने सिंहाचा वाटा उचलला.

Ravichandran Ashwin become second Indian bowler to claim fifty four wicket hauls in test cricket मुंबईः टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विन कानपूर टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला होता. आता मुंबईत त्याने न्युझीलंडविरोधात झालेल्या सामन्यात चार विकेट्स घेतले आहेत. त्यामुळे रविचंद्रन अश्विनचे टेस्ट क्रिकेटमधील ५० विकेट्स पूर्ण झाले आहेत. 

मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारतीय टीम ३२५ धावांवर बाद झाली. टीम इंडियाने न्युझीलंडला ६२ धावांवर बाद केले. या सामन्यात न्युझीलंडला बाद करण्यात मोहम्मद सिराजने सिंहाचा वाटा उचलला. पण अश्विनने ८ ओव्हर्समध्ये ८ रन्स देऊन चार विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे टेस्ट क्रिकेटमध्ये अश्विनच्या ५० विकेट्स पूर्ण झाल्या आहेत.

62 रन्समध्ये आटपला किवींचा खेळ

भारताने दीड दिवसापेक्षा अधिक काळ खेळून सर्वबाद ३२५ धावा केल्या. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पाहुण्या न्यूझीलंडचा डाव ६२ धावांत आटोपला. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रातच भारताचा दुसरा आणि कसोटी सामन्यातील तिसरा डाव सुरू झाला. 

एझाझ पटेलने घेतले १० विकेट्स

न्यूझीलंडच्या एजाझ पटेलने भारताच्या दहा विकेट घेतल्या. एका डावात प्रतिस्पर्धी संघाच्या सर्व खेळाडूंना बाद करण्याचा विक्रम करणारा एजाझ पटेल हा जगातील तिसरा गोलंदाज आहे. याआधी इंग्लंडच्या जीम लेकर आणि भारताच्या अनिल कुंबळेने अशी कामगिरी केली आहे.

एजाझ पटेलने ४७.५ ओव्हर टाकून ११९ धावा देत दहा विकेट घेतल्या. ज्या देशात जन्मला त्या देशाविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सर्वोच्च स्थानी पोहोचला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी