Ravichandran Ashwin: भर मैदानात कपड्यांचा वास का घेतोय अश्विन? कारण ऐकून आवरणार नाही हसू

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 08, 2022 | 14:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

टीम इंडियाा स्टार स्पिनर रवीचंद्रन अश्विनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो व्हिडिओचा वास घेऊन जॅकेट ओळखत आहे. व्हिडिओ पाहून चाहते मात्र मजा घेत आहेत. 

r ashwin
भर मैदानात कपड्यांचा वास का घेतोय रवीचंद्रन अश्विन? 
थोडं पण कामाचं
  • सुपर 12च्या शेवटच्या स्टेजमध्ये जेव्हा भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामनात झाला तेव्हा रोहित शर्मा टॉससाठी आला होता.
  • या दरम्यान व्हिडिओ ट्विटरवर टाकला. यात रोहित शर्मापासून काही दूर उभा असलेला रवीचंद्रन अश्विन दिसत आहे.
  • येथे अश्विननच्या हातात दोन जॅकेट्स असतात आणि तो आपले जॅकेट कोणते आहे याच्या शोधात आहे.

मुंबई: टीम इंडिया(team india) टी-20 वर्ल्ड कप 2022च्या(t-20 world cup 2022) सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे आणि 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध(india vs england) खेळण्यास तयार आहे. भारतीय संघाने जर हा वर्ल्डकप जिंकला तर गेल्या 15 वर्षांपासूनचा दुष्काळ संपेल. अशातच प्रत्येकाच्या नजरा सामन्यावर टिकून आहेत. यातच भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याचा एक व्हिडिओ(video) सोशल मीडियावर(social media) व्हायरल होत आहे. यात रवीचंद्रन अश्विनची(ravichandran ashwin) गंमत दिसत आहे. ravichandran ashwin choose right cloth video viral on social media

अधिक वाचा - एक वेळ डोळे दान करता येतील पण विकासाची दृष्टी नाही: गडकरी

सुपर 12च्या शेवटच्या स्टेजमध्ये जेव्हा भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामनात झाला तेव्हा रोहित शर्मा टॉससाठी आला होता. या दरम्यान व्हिडिओ ट्विटरवर टाकला. यात रोहित शर्मापासून काही दूर उभा असलेला रवीचंद्रन अश्विन दिसत आहे. येथे अश्विननच्या हातात दोन जॅकेट्स असतात आणि तो आपले जॅकेट कोणते आहे याच्या शोधात आहे. अखेर तो जॅकेटचा वास घेतो आणि अखेरीस एक जॅकेट आपल्या हातात घेऊन जातो. 

जसा हा व्हिडिओ लोकांच्या नजरेस पडला ट्विटरवर व्हायरल झाला. 30 लाखापेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि सातत्याने हा व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या वाढत हे. लोकांनी याची मजा घेताना म्हटले की आपले कपडे ओळखण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग. इतकंच नव्हे तर हा व्हिडिओल अधिकच व्हायरल झाला तेव्हा रवीचंद्रन अश्विनही काही म्हटल्यावाचून राहिला नाही. 

क्रिकेटर अभिनव मुकुंदने हा व्हिडिओ शेअर केला. त्यात लिहिले की हा व्हिडिओ हजारोवेळा पाहिला तरीही मला वारंवार हसू येत आहे. अश्विन प्लीज आम्हाला सांग की तु योग्य जॅकेट निवडण्यासाठी असे का केलेस. या ट्विटवर अश्विनने उत्तर दिले आणि विविध पॉईंट्सही दिले की त्याने असे का केले.हा व्हिडिओ लोकांना ट्विटरवर दिसला आणि पाहता पाहता व्हायरल झाला. 

रवीचंद्रन अश्विनने लिहिले ओळख पटवण्यासाठी योग्य साईज पाहिली ते जमले नाही. त्याच्यावर काही नाव लिहिले आहे का हे ही पाहिले. अखेर पाहिले की कोणता परफ्युम लागला आहे त्याने काम केले. कॅमेरामनला सलाम. 

अधिक वाचा - रेडिओग्राफीची गरज कधी पडते?

रवीचंद्रनचा हा अंदाज प्रत्येकाला आवडलाय आणि विविध प्रकारच्या मीम्स बनू लागल्या. टीम इंडियाचा स्टार स्पिनरबाबत बोलायचे झाल्यास त्याने पाच सामन्यात 6 विकेट घेतलेत. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने तीन विकेट घेतल्या होत्या. 
 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी