Team india: ८ महिन्यांनी या प्लेयरची टीम इंडियात एंट्री, रोहितने वाचवले संपलेले करिअर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 15, 2022 | 12:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit Sharma:वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये भारताच्या एका स्टार खेळाडूचे पुनरागमन झाले आहे. हा प्लेयर खूप शानदार फॉर्ममध्ये आहे. अशातच चांगली कामगिरी करत हा खेळाडू टीम इंडियामध्ये आपली जागा पक्की करेल. 

team india
८ महिन्यांनी या प्लेयरची टीम इंडियात एंट्री, करिअर वाचवले 
थोडं पण कामाचं
  • कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) आणि कोच राहुल द्रविडने(rahul dravid) एका स्टार खेळाडूवर विश्वास दाखवला आहे.
  • या खेळाडूचे आठ महिन्यांनी टीम इंडियात पुनरागमन झाले आहे
  • अशातच सिलेक्टर्स या खेळाडूला संधी देत त्याचे संपलेले करिअर पुन्हा वाचवत आहे. हा खेळाडू खूपच शानदार फॉर्मात आहे

मुंबई: भारतीय टीमला(indian team) इंग्लंडनंतर(england) आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर(west indies tour) ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठी निवड समितीने(selection comittee) संघाची घोषणाही केली आहे. कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) आणि कोच राहुल द्रविडने(rahul dravid) एका स्टार खेळाडूवर विश्वास दाखवला आहे. या खेळाडूचे आठ महिन्यांनी टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. अशातच सिलेक्टर्स या खेळाडूला संधी देत त्याचे संपलेले करिअर पुन्हा वाचवत आहे. हा खेळाडू खूपच शानदार फॉर्मात आहे.Ravichandran Ashwin comeback in team India

अधिक वाचा - जावई म्हणाला सासूला तुम्हीच नांदायला चला, यानंतर घडल 'असं'

या खेळाडूला मिळाली संधी

भारतीय संघात गोलंदाज रवीचंद्रन अश्विनचे पुनरागमन झाले आहे. अश्विनने आपला शेवटचा टी-२० सामना नोव्हेंबर २०२१मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर आता रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियामध्ये त्याचे पुनरागमन झाले आहे. अश्विनने तब्बल ८ महिन्यांनी टीम इंडियात आपले स्थान बनवले आहे. अश्विन तुफानी गोलंदाजी करण्यात माहीर आहे. 

शानदार फॉर्ममध्ये आहे अश्विन

रवीचंद्रन अश्विनकडे प्रचंड अनुभव आहे जो टीम इंडियाच्या उपयोगी पडू शकतो. त्याच्या गुगली आणि कॅरम बॉलवर खेळणे सोपे नाही. फलंदाज त्याचे बॉल लवकर जज करू शकत नाहीत आणि बाद होतात. अश्विनकडे ती कला आहे जो कोणत्याही पिचवर विकेट मिळवू शकेल. याआधी रवीचंद्रन अश्विनने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिलेत. 

खेळू शकतो टी-२० वर्ल्डकप

रवीचंद्रन अश्विनने गेल्या वर्षी टी-२० वर्ल्डकप २०२१ खेळला होता आणि त्याने आपल्या गोलंदाजीने साऱ्यांची मने जिंकली होती. अश्विन लवकर आपल्या ओव्हर संपवतो. जर अश्विनने वेस्ट इंडिज दौऱ्यावर शानदार कामगिरी केी तर त्याला टी-२० वर्ल्डकपमध्ये संधी मिळू शकते. येथे युझवंद्र चहलचा तो जोडीदार बनू शकतो. अश्विन काही बॉलमध्येच सामन्याचे चित्र बदलतो.

अधिक वाचा -  'दिघेंवर सिनेमा बनवला, तोही आवडला नाही', शिंदेंचा गौप्यस्फोट

फलंदाजीतही माहीर

रवीचंद्रन अश्विन खालच्या क्रमांकावर विस्फोटक फलंदाजी करण्यात माहीर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनच्या नावावर ६ शतके आहेत. तो कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग आहे. अश्विन भारताकडून आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाता भाग राहिला आहे. अश्विन भारतीय पिचवर मोठा यशस्वी राहिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी