IND vs ENG: आर अश्विनकडून रेकॉर्ड्सचा पाऊस, 'ही' कामगिरी करणारा ठरला पहिला बॉलर

टीम इंडियाचा प्रमुख ऑफ स्पिनर रविचंद्र्न अश्विन याने इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये एकूण 32 विकेट्स घेतल्या. यासोबतच आर अश्विनने आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड्सची नोंद केली आहे.

Ravichandran Ashwin
आर अश्विनकडून रेकॉर्ड्सचा पाऊस, ही कामगिरी करणारा ठरला पहिला बॉलर 

थोडं पण कामाचं

  • इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये आर अश्विनकडून रेकॉर्ड्सचा पाऊस
  • इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये आर अश्विनने घेतल्या 32 विकेट्स
  • रविचंद्रन अश्विनने शेन वॉर्न आणि इमरान खानच्या रेकॉर्डची केली बरोबरी

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात चार टेस्ट मॅचेसची सीरिज पूर्ण झाली असून ही सीरिज 3-1 ने टीम इंडियाने आपल्या नावावर केली. या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा बॉलर रविचंद्रन अश्विन याने रेकॉर्ड्सचा पाऊस पाडला आहे. गेल्या टेस्ट मॅचमध्ये 400 विकेट्स पूर्ण करणाऱ्या रविचंद्रन अश्विन याने संपूर्ण सीरिजमध्ये एकूण 32 विकेट्स घेतल्या. यासोबतच अश्विन हा पहिला भारतीय बॉलर बनला आहे ज्याने सीरिजमध्ये दुसऱ्यांदा 30 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी 2015 मध्ये रविचंद्रन अश्विन याने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध खेळताना टेस्ट सीरिजमध्ये एकूण 31 विकेट्स घेतल्या होत्या. (Ravichandran Ashwin makes a record with 32 wickets against england test series)

बिशन सिंह बेदी, हरभजन सिंह, बीएस चंद्रशेखर आणि कपिल देव हे माजी भारतीय क्रिकेटर्स आहेत ज्यांनी एका टेस्ट सीरिजमध्ये 30 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, रविचंद्रन अश्विन याने दुसऱ्यांदा ही कामगिरी केली आहे.

चार टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये असे घेतले अश्विनने 32 विकेट्स

पहिली टेस्ट 

पहिली इनिंग - 3 विकेट्स
दुसरी इनिंग - 6 विकेट्स

दुसरी टेस्ट 

पहिली इनिंग - 5 विकेट्स
दुसरी इनिंग - 3 विकेट्स

तिसरी टेस्ट 

पहिली इनिंग - 3 विकेट्स
दुसरी इनिंग - 4 विकेट्स

चौथी टेस्ट 

पहिली इनिंग - 3 विकेट्स
दुसरी इनिंग - 5 विकेट्स

कर्टली एंब्रोसला मागे टाकलं

रविचंद्रन अश्विन याने जगात सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत वेस्ट इंडिजचा माजी फास्ट बॉलर कर्टली एंब्रोस (405) याला मागे टाकलं आहे. अश्विनने 78 टेस्ट मॅचेसमध्ये 409 विकेट्स घेतल्या आहेत. तर एंब्रोस याने 98 मॅचेसमध्ये 405 विकेट्स घेतल्या होत्या. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत अश्विन भारतात चौथ्या स्थानावर तर जगात 15व्या स्थानावर आहे. 

शेन वॉर्न - इमरान खानच्या रेकॉर्डची बरोबरी

रविचंद्रन अश्विन याने इंग्लंड विरुद्धच्या चार टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने मॅन ऑफ द सीरिजचा किताब मिळवला आहे. अश्विनने आपल्या करिअरमध्ये आठव्यांदा मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला आहे आणि अनेक दिग्गजांची बरोबरी केली आहे. 

रविचंद्रन अश्विन याने न्यूझीलंडच्या सर रिचर्ड हेडली, पाकिस्तानच्या इमरान खान आणि ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न यांच्या सर्वाधिक मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार जिंकण्याच्या रेकॉर्डची बरोबरी करत संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावण्याचा मान श्रीलंकेच्या मुथैय्या मुरलीथरन (11) याच्या नावावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिस (9) दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

हेराथच्या रेकॉर्डची बरोबरी

रविचंद्रन अश्विन याने टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक वेळा इनिंगमध्ये पाच विकेट्स घेणाऱ्या श्रीलंकेच्या रंगना हेराथ याची बरोबरी केली आहे. अश्विन आणि हेराथ यांनी 25 वेळा एका इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतल्या आहेत ज्यामध्ये त्यांच्या टीमचा विजय झाला आहे. मुथैय्या मुरलीथरन (41) या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर शेन वॉर्न (27) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी