Ravindra Jadeja: मोठी बहीण नैनामुळे भारतीय क्रिकेट संघाचा भाग बनला रवींद्र जडेजा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 26, 2022 | 17:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

cricket journey of Ravindra jadeja: रवींद्रसिंह अनिरुद्धसिंह जडेजाला चाहते प्रेमाने सर जडेजा असे म्हणतात. या जबरदस्त खेळाडूला इथवर पोहोचण्याससाठी बऱ्याच आव्हानाचा सामना करावा लागला. 

ravindra jadeja
या व्यक्तीमुळे जडेजा आज टीम इंडियात आहे नाहीतर.... 
थोडं पण कामाचं
  • रवींद्र जडेजाचे क्रिकेट लाईफ
  • असे होते खडतर जीवन
  • बहीणीने दिले धैर्य आणि सुधारले जीवन

मुंबई:  रवींद्रसिंह अनिरुद्धसिंह जडेजाला(ravindra jadeja) क्रिकेटचे चाहते प्रेमाने सर जडेजा असे म्हणतात. हा टीम इंडियाचा(team india) ऑलराऊंडर खेळाडू(allrounder player) आहे. हा डाव्या बाताने फलंदाजी आणि स्पिन गोलंदाजीही करतो. चाहते त्याला प्रेमाने सर जडेजा नावाने ओळखतात. या जबरदस्त खेळाडूला इथवर पोहोचण्यासाठी अनेक कठीण आव्हानांचा सामना करावा लागला. लोकांनी क्रिकेटच्या पिचवर नेहमी टिकून राहणऱ्या या खेळाडूची मेहनत पाहिली आहे मात्र त्याला येथे पोहोचण्यासाठी कोणत्या-कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला हे अनेकांना माहीत नाहीये. (ravindra cricket journey in team india)

अधिक वाचा - शिंदे गटात सामील झालेल्या खोतकरांचं मोठं विधान, म्हणाले....

१७व्या वर्षी आईला गमावले

रवींद्र जडेजाने १७व्या वर्षी आपल्या आईला गमावले. त्याची आई लता यांचे २००५मध्ये झालेल्या एका अपघातात निधन झाले होते. आई तर सोडून गेली मात्र या अपघाताने मुलाचे मात्र अर्धे प्राण घेतले. आईच्या मृत्यूनंतर जडेजाला मोठा धक्का बसला होता त्यामुळे त्याने क्रिकेट सोडून देण्याचा विचार केला होता. त्याच्या आईला त्याला क्रिकेटर होताना पाहायचे होते. मात्र तिचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. क्रिकेटच्या मागे धावणारा हा मुलगा आता या खेळापासून पूर्णपणे दूर गेला होता. 

मोठ्या बहीणीने सांभाळली घराची जबाबदारी

रवींद्र जडेजाच्या आईच्या निधनानंतर जडेजाला मोठा धक्का बसला होता. मात्र त्याची बहीण नैनाने घराची जबाबदारी सांभाळली. जडेजाच्या मोठ्या बहिणीने त्याला खूप धीर दिला आणि तो आज भारताचा सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून समोर आले. त्याच्या बहिणीने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलली आणि आपल्या भावाला तितके सक्षम केले. 

जडेजाला आर्मी ऑफिसर बनवायचे होते

जडेजाचा जन्म ६ डिसेंबर  १९८८मध्ये गुजरातच्या जामनगर जिल्ह्याच्या गुजरात राजपूत कुटुंबात झाला होता. त्याचे वडील अनिरुद्ध एका खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये चौकीदार होते. त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्यांचा मुलगा रवींद्र जडेजा याने आर्मीमध्ये जावे मात्र मुलाच्या डोक्यात क्रिकेटचे खूळ सुरू होते. आज रवींद्र जडेजा एक यशस्वी क्रिकेटर आहे. 

अधिक वाचा - नोकरदारांनी आयटीआर भरणाऱ्यांनी तयार ठेवा हे 9 दस्तावेज

जडेजाचे आंतरराष्ट्रीय करिअर

रवींद्र जडेजाचे करिअर आतापर्यंत शानदार राहिले. १७१ वनडे सामन्यात जडेजाने २४४७ धावा केल्या. यात १३ अर्धशतकांचा समावेश असून त्याच्या नावावर १८९ विकेटही आहेत. ६० कसोटी सामन्यांत त्याने २५२३ धावा केल्यात तसेच यात त्याने २४२ विकेटही मिळवल्यात. टी-२० क्रिकेटमध्ये जडेजा आताप४यंत ६० सामने खेळला आहे. यात जडेजाच्या नावावर ३७९ धाव आणि ४८ विकेट आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी