Ravindra Jadeja 'Pushpa' Viral Video: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' या सिनेमाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाचे छोटे-छोटे व्हिडिओ प्रेक्षक शेअर करत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्यावरही या चित्रपटाला रंग चढला आहे. या चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध डायलॉग म्हणत जडेजाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
जडेजाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या चाहत्यांना त्याची ही स्टाईल आवडली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याला चित्रपटात काम करण्याचा सल्ला त्याचे फॅन्स त्याला देत आहेत. पुष्पा चित्रपट ७ डिसेंबरला रिलीज झाला होता. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही रिलीज झाला आहे.
रवींद्र जडेजा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा भाग नाही. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन करत आहे. जडेजाची दुखापत बरी होण्यास बराच वेळ लागू शकतो. मात्र, तो आयपीएल २०२२ पूर्वी बरा होईल, असे मानले जात आहे.