Ravindra Jadeja Pushpa: अल्लू अर्जुनचा फॅन झाला रवींद्र जडेजा; चित्रपट 'पुष्पाच्या' या अवतारात झळकला, पाहा फोटो

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 13, 2022 | 15:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pushpa Fan Ravindra Jadeja | भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. दरम्यान क्रिकेटच्या मैदानातून बाहेर असलेला जडेजा सध्या खूप चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे त्याची अभिनयाची शैली. जडेजा तेलगु चित्रपट असलेल्या पुष्पाचा जबरदस्त फॅन झाला आहे.

Ravindra Jadeja became a fan of Allu Arjun The photo share in the incarnation of 'Pushpa'
अल्लू अर्जुनचा फॅन झाला रवींद्र जडेजा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मैदानाबाहेर असूनही जडेजा चर्चेत
  • नव्या लूकमुळे जडेजा चर्चेत
  • जडेजाने नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला, अनेकांनी केले कौतुक

Pushpa Fan Ravindra Jadeja | नवी दिल्ली : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघातून बाहेर आहे. दरम्यान क्रिकेटच्या मैदानातून बाहेर असलेला जडेजा सध्या खूप चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे त्याची अभिनयाची शैली. जडेजा तेलगु चित्रपट असलेल्या पुष्पाचा (Pushpa Movie) जबरदस्त फॅन झाला आहे. अलीकडेच त्याने या चित्रपटातील एका डायलॉगाची नक्कल केली होती आणि त्याला सोशल मीडियावर शेअर देखील केले होते. मात्र आता पुन्हा एकदा त्याने या चित्रपटाचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो चित्रपटातील अभिनेता 'पुष्पाराज' म्हणजेच अल्लू अर्जुन (Allu Arjun) सारखा दिसण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याची नक्कल करण्यात तो बऱ्यापैकी यशस्वी देखील झाला. (Ravindra Jadeja became a fan of Allu Arjun The photo share in the incarnation of 'Pushpa').   

फॅन्सदेखील जडेजाच्या अदावर फिदा

सोशल मीडियावरही चाहते जडेजाच्या या लूकचे खूप कौतुक करत आहेत. रवींद्र जडेजाने हा फोटो इंस्टाग्राम आणि ट्विटरवर (Instagram And Twitter) शेअर केला आहे. यामध्ये तो अल्लू अर्जुनप्रमाणेच बिडी ओढताना दिसत आहे. मात्र त्याच्या कॅप्शनमध्ये जडेजाने चाहत्यांना त्याचे सेवन न करण्याचे आवाहन देखील केले आहे.

जडेजाने कॅप्शनमध्ये म्हटले... 

त्याने लिहले की, कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचे सेवन करणे हानिकारक आहे. आपल्याला माहित आहे की पुष्पा म्हणजे फुल. मी कोणत्याही प्रकारच्या धूम्रपानाचे समर्थन करत नाही. हे सर्व मी फक्त फोटोंच्या निमित्ताने केले. सिगारेट, बिडी आणि तंबाखू आरोग्यासाठी हानिकारक आहेत. यामुळे कर्करोग होतो आणि त्याचे सेवन करू नका.

Read Also : Rishabh Pant: ५ डावांमद्ये ८६ धावा, पंतने वाढवली समस्या

व्हिडीओ देखील केला होता शेअर 

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले. खुद्द अष्टपैलू रवींद्र जडेजाही या चित्रपटाचे वेड लागले आहे. या फोटोपूर्वी त्याने चित्रपटाचा हिट डायलॉग बोलताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

सध्या दुखापतग्रस्त आहे जडेजा 

जडेजा सध्या दुखापतीचा सामना करत आहे. सध्या तो बंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर उपचार करत आहे. जडेजाची दुखापती ठिक होण्यासाठी महिन्यांचा देखील कालावधी लागू शकतो. असे झाल्यास तो आयपीएल २०२२ च्या जवळपासच ठिक होऊ शकतो. 

सीएसकेकडून खेळणार जडेजा 

जडेजा आयपीएलच्या हंगामात देखील चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसेल. त्याला चेन्नईच्या फँचायझीने १६ कोटींमध्ये रिटेन केले आहे. त्याला कर्णधार धोनीपेक्षा जास्त मानधन मिळणार आहेत. धोनीला सीएसकेने १२ कोटींमध्ये आपल्या संघात कायम ठेवले आहे. जडेजा आणि धोनी या व्यतिरिक्त संघाने ऋतुराज गायकवाड आणि मोईन अलीला रिटेन केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी