[VIDEO] रवींद्र जडेजाचा हा भन्नाट कॅच पाहणं अजिबात चुकवू नका! 

क्राइस्टचर्च कसोटीच्या दुसर्‍या दिवशी रवींद्र जडेजाने नील वॅग्नरचा एक जबरदस्त कॅच घेऊन सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं.

ravindra jadeja caught wagner's amazing catch see video ind vs nz second test match 
[VIDEO] जडेजाचा हा भन्नाट कॅच पाहणं अजिबात चुकवू नका! (सौजन्य: BCCI)  |  फोटो सौजन्य: Twitter

क्राइस्टचर्चः रविचंद्रन अश्विनच्या जागी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघात फिरकीपटू रवींद्र जडेजा याला स्थान देण्यात आलं. जडेजा हा एक असा खेळाडू आहे की जो  कोणत्या ना कोणत्या मार्गाने मैदानावर आपली उपस्थिती सर्वांना दर्शवित असतो. पहिल्या दिवशी फलंदाजी आणि गोलंदाजीत अपयशी ठरल्यानंतर भारतीय संघाने सामन्याच्या दुसर्‍या दिवशी शानदार गोलंदाजी केली आणि कीवी संघाला २३५ धावांत गुंडाळलं. 

न्यूझीलंडच्या संघाने १७७ धावांत ८ गडी गमावले होते. परंतु त्यानंतर तळाचे फलंदाज काइल जेमीसन व नील वॅग्नर यांनी नवव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला अडचणीत आणले होते.

अशा परिस्थितीत जेव्हा या दोन्ही फलंदाजांमध्ये ५१ धावांची भागीदारी झाली होती तेव्हा मोहम्मद शमीच्या एका शॉर्ट पिच चेंडूवर डीप मिडविकेटवर सुपरमॅन रवींद्र जडेजाची जादू पाहायला मिळाली. कारण त्याने अतिशय शानदार झेप घेत वॅगनरचा अविश्वसनीय असा कॅच पकडला. 

हे सर्व इतक्या झटपट घडलं की ते दृश्य पाहणाऱ्या मैदानावरील प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसला. तर कॅच पकडल्यानंतर स्वत: जडेजादेखील खूप उत्साही दिसत होता. त्यामुळे स्फोटक फलंदाजी करणाऱ्या वॅग्नरची खेळी २१ धावांमध्येच संपुष्टात आली.

हा जबरदस्त कॅच घेतल्यानंतर जडेजा म्हणाला की, चेंडू इतक्या वेगाने त्याच्या दिशेने येईल अशी अपेक्षा नव्हती. जडेजा म्हणाला, 'मला असं वाटत होतं की ते डीप स्क्वायर लेगच्या दिशेने धावा करतील. पण मला अपेक्षा नव्हती की, बॉल माझ्याकडे इतक्या वेगाने येईल. चेंडू हवेच्या वेगाने प्रचंड जोरात माझ्याकडे आला आणि मी कॅच देखील पकडला. मी जेव्हा कॅच पकडला तेव्हा मला स्वत:लाच कळलं नाही की, मी कॅच पकडला आहे की नाही.' 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी