IND vs AUS : BCCI चा निर्णय, 8 महिन्यांनंतर Team India मध्ये Match Winner खेळाडूचे पुनरागमन

Ravindra Jadeja return to India ODI squad for Australia series : शुक्रवार 17 मार्च 2023 पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वन डे मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडियामध्ये (Team India) 8 महिन्यांनंतर एका मॅच विनर (Match Winner) खेळाडूचे पुनरागमन होणार आहे.

Ravindra Jadeja
Team India मध्ये Match Winner खेळाडूचे पुनरागमन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Team India मध्ये Match Winner खेळाडूचे पुनरागमन
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन डे सीरिज खेळणार
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या वन डे टीमची घोषणा

Ravindra Jadeja return to India ODI squad for Australia series : भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 4 टेस्ट मॅचची सीरिज सुरू आहे. या सीरिजमध्ये भारत 2-1 असा आघाडीवर आहे. निर्णायक टेस्ट मॅच गुरुवार 9 मार्च 2023 पासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. यानंतर शुक्रवार 17 मार्च 2023 पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वन डे मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडियामध्ये (Team India) 8 महिन्यांनंतर एका मॅच विनर (Match Winner) खेळाडूचे पुनरागमन होणार आहे. भारताच्या राष्ट्रीय निवड समितीने या मॅच विनर खेळाडूचा समावेश वन डे सीरिजसाठीच्या टीममध्ये केला आहे.

मॅच विनर खेळाडू अशी ओळख मिरवणारा हा खेळाडू अष्टपैलू आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या सर्व प्रकारांमध्ये त्याने महत्त्वाच्या क्षणी टीमसाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. हा खेळाडू आहे रवींद्र जडेजा. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला पण रवींद्र जडेजाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. 

रवींद्र जडेजा शेवटची वन डे मॅच जुलै 2022 मध्ये मँचेस्टर येथे इंग्लंड विरोधात खेळला होता. आता त्याला पुन्हा संधी मिळाली आहे. 

वन डे क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाने 171 मॅच खेळून 2447 धावा केल्या आहेत. त्याने 13 हाफ सेंच्युरी (अर्धशतके) केल्या आहेत, 87 धावा ही वन डे क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 

रवींद्र जडेजाने वन डे क्रिकेटमध्ये 8611 बॉल टाकून 189 विकेट घेतल्या आहेत. वन डे मध्ये एका डावात 5 विकेट घेण्याची कामगिरी त्याने एकदा केली आहे. एका डावात 36 धावा देत 5 विकेट त्याने घेतल्या आहेत. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच रवींद्र जडेजाने वन डे क्रिकेटमध्ये 63 कॅच घेतले आहेत.

रवींद्र जडेजाची 'लय भारी' कामगिरी, महारेकॉर्डसह रचला इतिहास

Test Match जी फक्त 10 बॉलमध्येच संपली

भारतीय संघ / Team India : रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (व्हाईस कॅप्टन), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

  1. गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 ते सोमवार 13 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली टेस्ट, विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नागपूर - भारत 1 डाव आणि 132 धावांनी विजयी
  2. शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी टेस्ट, अरुण जेटली स्टेडियम दिल्ली - भारत 6 विकेट राखून विजयी
  3. बुधवार 1 मार्च 2023 ते रविवार 5 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी टेस्ट, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम धरमशाला - ऑस्ट्रेलिया 9 विकेट राखून विजयी
  4. गुरुवार 9 मार्च 2023 ते सोमवार 13 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी टेस्ट, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद - सकाळी 9.30
  5. शुक्रवार 17 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली वन डे, वानखेडे स्टेडियम मुंबई - दुपारी 2
  6. रविवार 19 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी वन डे, डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए - व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम - दुपारी 2
  7. बुधवार 22 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी वन डे, एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई - दुपारी 2

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी