IND vs AUS 2nd Test Match: रविंद्र जडेजाचा फलंदाजीसह गोलंदाजीतही विक्रम; कपिल अन् इमरानला मागे टाकत बनवला आशियाई रेकॉर्ड

IND vs AUS : रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) नवी दिल्लीत (New Delhi) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या (2nd Test Match) पहिल्या डावात उस्मान ख्वाजाची विकेट घेत एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

Ravindra Jadejas record in batting and bowling, took 250 wickets in test
Ravindra Jadeja Record  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जडेजा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद 250 पेक्षा विकेट घेणारा गोलंदाज बनला.
  • जडेजापेक्षा इंग्लंडचा माजी कर्णधार इयान बॉथम याने जलद वेगाने हा पराक्रम केला होता.
  • करिअरच्या 55व्या कसोटीसमान्यात त्याने हा पराक्रम केला होता.

Ravindra Jadeja Record: टीम इंडियाचा डॅशिंग अष्टपैलू  (all round) रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) नवी दिल्लीत (New Delhi) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या (2nd Test Match) पहिल्या डावात उस्मान ख्वाजाची विकेट घेत एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. या डावात रविंद्र जडेजाने गोलंदाजीसह फलंदाजीतही आशियाई विक्रम बनवला आहे. (IND vs AUS: Ravindra Jadeja's record in batting and bowling;took 250 wickets in test )

अधिक वाचा  : महाशिवरात्रीला चुकूनही 'या' 5 वस्तू शिवलिंगावर अर्पण करू नका

केएल राहुलने उस्मान ख्वाजा शानदार झेल घेत जडेजाच्या खात्यात 250 वी विकेट जमा करून दिली. क्रिकेटच्या इतिहातसातील दिग्गज कपिल देव आणि इमरान खान यांना मागे टाकत जडेजा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद 250 पेक्षा विकेट घेणारा गोलंदाज बनला. त्याचबरोबर जडेजा 2500 पेक्षा जास्त धावा करणारा आशियाई क्रिकेटर बनला आहे. 

अधिक वाचा  :  महाशिवरात्रीला करा हे उपाय; लीच्या लग्नातील अडथळे होतील दूर

जडेजाने आपली 62वी कसोटी खेळताना ही कामगिरी केली. इंग्लंडचा माजी कर्णधार इयान बॉथम हा पराक्रम आधी केला होता. जडेजापेक्षा जलद वेगाने बॉथम याने हा पराक्रम केला होता. करिअरच्या 55व्या कसोटीसमान्यात त्याने हा पराक्रम केला होता. तर या विक्रमासाठी इम्रान खानला यासाठी 64 आणि कपिल देव यांना 65 कसोटी खेळावे लागले.

250 कसोटी बळी घेणारा आठवा भारतीय

कसोटी क्रिकेटमध्ये 250 बळींचा टप्पा गाठणारा जडेजा आठवा भारतीय ठरला आहे. त्याच्याआधी अनिल कुंबळे, रविचंद्रन अश्विन, कपिल देव, हरभजन सिंग, इशांत शर्मा, झहीर खान, बिशनसिंग बेदी या खेळाडूंनी 250 विकेट घेतल्या आहेत. जडेजाने 62 व्या कसोटीच्या 117 व्या डावात गोलंदाजी करताना 24.42 च्या सरासरीने 250 कसोटी बळी घेतले आहेत. 

अधिक वाचा  : महाशिवरात्री कधी कराल रुद्राभिषेक जाणून घ्या शुभ मुहूर्त

 फलंदाजीतही कमाल

जडेजाने 62 कसोटी सामन्यांच्या 90 डावांमध्ये फलंदाजी करताना 37.04 च्या सरासरीने कसोटी क्रिकेटमध्ये 2593 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतके आणि 18 अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद 175* ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी