IPl 2022: फ्लॉप ठरलेल्या रोहित सेनेच्या हातात आरसीबीचं भवितव्य; मुंबई इंडियन्सच्या सपोर्टसाठी विराट जाणार वानखेडेवर

आयपीएलच्या (IPL) 15व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore)  प्लेऑफचे (Playoff) सामने खेळणार की नाही? हे आता मुबई (Mumbai Indians)-दिल्ली (Delhi Capitals) सामन्यावर अवलंबून असणार आहे. दरम्यान या हंगामात फ्लॉप ठरलेल्या मुंबईच्या हातात आरसीबीचं भवितव्य असणार आहे. यामुळे या फ्लॉप संघाला विराट कोहली वानखेडेवर विराटपणे चिअर करणार आहे. 

playoffs game  in the hands of the flop team, Virat will cheer
फ्लॉप संघाच्या हातात प्लेऑफच्या नाड्या, विराट करणार चिअर   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मुंबई आणि दिल्ली यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना खेळणार
  • आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे भवितव्य आता मुंबई इंडियन्सच्या हातात
  • रोहित शर्माच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला तर आरसीबी प्लेऑफमध्ये जाणार

Kohli Cheer to MI : मुंबई : आयपीएलच्या (IPL) 15व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore)  प्लेऑफचे (Playoff) सामने खेळणार की नाही? हे आता मुबई (Mumbai Indians)-दिल्ली (Delhi Capitals) सामन्यावर अवलंबून असणार आहे. दरम्यान या हंगामात फ्लॉप ठरलेल्या मुंबईच्या हातात आरसीबीचं भवितव्य असणार आहे. यामुळे या फ्लॉप संघाला विराट कोहली वानखेडेवर विराटपणे चिअर करणार आहे. 

मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) मुंबई आणि दिल्ली यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना खेळणार आहेत. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. परंतु आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे भवितव्य आता मुंबई इंडियन्सच्या हातात आहे. शनिवारच्या सामन्यात रोहित शर्माच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला तर आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचेल. जर दुसरीकडे मुंबईचा पराभव झाला तर फाफ डू प्लेसिसच्या संघाचा प्रवास संपुष्टात येईल. मुंबई- दिल्ली सामना पाहण्यासाठी आणि रोहित सेनेला पाठिंबा देण्यासाठी आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वानखेडेवर उपस्थिती दर्शवणार आहे. 

विराट कोहली मुंबईला करणार सपोर्ट 

दरम्यान, विराट कोहली मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्याबाबत उघडपणे बोलला आहे. मुंबई आणि बंगळुरू यांच्यात मैदानावर नेहमीच स्पर्धा असते. दोन्ही टीमचे चाहते एकमेकांना ट्रोल करताना आपण पाहिले आहे. पण आता विराट कोहलीसोबतच बंगळुरूचे सगळे चाहते मुंबईला साथ देत आहेत. 

बंगळुरूचा गुजरातच्या संघावर आठ विकेट्सनं विजय 

'करो या मरो'च्या लढतीत विराट कोहलीच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने गुजरातचा आठ विकेटने पराभव केला. या विजयासह आरसीबीने प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय. पण आरसीबीचं प्लेऑफचं तिकीट मुंबई इंडियन्सच्या हातात आहे.

मुंबईच्या हातात आरसीबीचं भवितव्य, पाहा समीकरण

21 मे रोजी शनिवारी मुंबई आणि दिल्ली आपला अखेरचा साखळी सामना खेळणार आहेत. या सामन्याकडे आरसीबीच्या चाहत्यांचेही लक्ष असणार आहे. कारण, या सामन्यावर आरसीबीचं प्लेऑफचा प्रवेश ठरणार आहे. अखेरच्या लीग सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव केल्यास आरसीबीचा सरळ प्लेऑफमध्ये प्रवेश होईल... पण जर दिल्लीने मुंबईवर विजय मिळवल्यास आरसीबीचे आव्हान संपुष्टात येईल. मुंबईचा पराभव झाल्यास आरसीबी आणि दिल्ली यांचे 16 गुण होतील. पण दिल्लीचा नेट रनरेट दिल्लीपेक्षा चांगला आहे. त्यामुळे नेटरनरेटच्या आधारावर दिल्लीला प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. आरसीबीचा नेटरनरेट -253 इतका आहे तर दिल्लीचा नेटरनरेट + 225 इतका आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी