पहिल्या नजरेत झाले प्रेम..वयात १० वर्षांचे अंतर,  Irfan Pathan-saif baigची प्रेमकहाणी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 30, 2021 | 16:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Irfan Pathan-Safa Baig Love Story:भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने ४ फेब्रुवारी २०१६मध्ये एक सौदी मॉडेल सफा बेग हिच्याशी लग्न केले. दोघांची लव्हस्टोरी खूपच रोमांचक आहे.

irfan pathan and safa baig
पहिल्या नजरेत झाले प्रेम...Irfan Pathan-saifची प्रेमकहाणी 
थोडं पण कामाचं
  • इरफान आणि त्याची पत्नी सफा २०१४मध्ये पहिल्यांदा भेटले होते.
  • इऱफानला पहिल्या नजरेतच सफावर प्रेम जडले.
  • १० वर्षाच्या वयाचे अंतर अतानाही इरफान आणि सफा यांनी एकमेकांशी लग्न करण्याचे ठरवले.

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने(irfan pathan) आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये बॉल आणि बॅटने खूप धमाल केली. हेच कारण होते की ज्यामुळे त्याला पुढील कपिल देव म्हटले जात असे. इरफान पठाणनच्या शानदार करिअरशिवाय त्यांच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे झाल्यास त्यांची सुंदर प्रेमकहाणी(love story) खूप कमी लोकांना माहीत आहे. इऱफानची पत्नी सफा बेग  (Safa Baig)२८ फेब्रुवारी १९९४मध्ये सौदी अरेबियामध्ये झाला होता. शाळेच्या दिवसांतच सफाला मॉडेलिंगमध्ये आवड निर्माण झाली होती. तिच्या आई-वडिलांनी तिला यासाठी पूर्ण पाठिंबा दिला. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर सफा गल्फमदील सर्वात प्रसिद्ध मॉडेलपैकी एक बनली. Real love story of Irfan pathan and safa baig

मीडिया रिपोर्ट्सनुसार इरफान आणि त्याची पत्नी सफा २०१४मध्ये पहिल्यांदा भेटले होते. इऱफानला पहिल्या नजरेतच सफावर प्रेम जडले. १० वर्षाच्या वयाचे अंतर ्सतानाही इरफान आणि सफा यांनी एकमेकांशी लग्न करण्याचे ठरवले. सलग दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंरतर इरफानने सफाची भेट वडोदरामध्ये तिच्या आई-वडिलांशी घडवून आणली. यानंतर दोन्ही कुटुंबानी लग्नाला संमती दिल.\

४ फेब्रुवारी २०१६मध्ये इरफान आणि सफा कायमचे एकमेकांचे झाले. आपल्या निकाहनंतर दोघेही आपल्या कुटुंबियांसह वडोदरासाठी रवाना झाले. येथे त्याने आपल्या मित्रांसाठी लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये एका डिनरचे आयोजन केले होते. लग्नाचे रिसेप्शन हे एखाद्या सेलिब्रेटी एक्सपोपक्षा कमी नव्हते. इरफा आणि सफा २० डिसेंबर २०१६मध्ये एका मुलाचे आई-बाबा बनले होते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार इरफान पठाणची एकूण संपत्ती तब्पल ७ मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच साधारण ५१ कोटी रूपये आहे. इरफानची दर महिन्याची कमाई तब्बल ३५ लाख रूपये आहे. तर वार्षिक कमाई ४ कोटी रूपये. वडोदरामध्ये त्याचे आलिशान घर आहे आणि त्याची किंमत ६ कोटी असल्याचे सांगितले जाते. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, महिंद्रा स्कॉर्पिओ आणि टोयोटा फॉर्च्युनर अशा गाड्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी