Mumbai Indians Hardik Pandya : म्हणून मुंबई इडियन्समध्ये हार्दिक पांड्याची नाही झाली वापसी, हे कारण आले समोर

Mumbai Indians Hardik Pandya मुंबई इंडियन्सने २०२२ च्या मेगा ऑक्शनपूर्वी आपल्या यादीत हार्दिक पांड्याचे नाव वगळले आहे.  हार्दिक  पांड्या लवकरच कमबॅक करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 

थोडं पण कामाचं
  • मुंबई इंडियन्सने २०२२ च्या मेगा ऑक्शनपूर्वी आपल्या यादीत हार्दिक पांड्याचे नाव वगळले आहे. 
  • मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ तीन खेळाडूंना पुन्हा संधी दिली आहे.
  • पांड्या लवकरच कमबॅक करेल अशी आशा

Mumbai Indians Hardik Pandya : मुंबई : पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर करणार्‍या मुंबई इंडियन्सने २०२२ च्या मेगा ऑक्शनपूर्वी आपल्या यादीत हार्दिक पांड्याचे नाव वगळले आहे.  हार्दिक  पांड्या लवकरच कमबॅक करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. (reason behind hardik pandya not retained in mumbai indian ipl team 2022 )
 
 

हार्दिक पांड्याचे वापसी नाही
 

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ साठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सुर्यकुमार यादव आणि किरोन पोलार्ड यांना संघाने पुन्हा संधी दिली आहे.  

या खेळाडूंना वगळले

फक्त हार्दिक पांड्याच नव्हे तर विकेटकीपर इशान किशन यालाही मुंबई इंडियन्सने वगळले आहे. 

 

अवघड प्रक्रिया

मुंबई इंडियन्स संघाचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स आणि भारताचा माजी गोलंदाज झहीर खानने यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका खेळाडूला पुन्हा संघात घेण्याची प्रक्रिया फार अवघड असते असे झहीरने म्हटले आहे. हार्दिक लवकरच कमबॅक करेल अशी अपेक्षा झहीरने व्यक्त केली आहे. एखाद्या खेळाडूला परत संघात घ्यायचे की नाही हे अनेक बाबींवर अवलंबून असते. एका खेळाडूवर वेळ आणि ऊर्जा खर्च केल्यानंतर त्याला पुन्हा टीममध्ये ने घेणे ही फार दुःखदायक बाब असल्याचे झहीरने म्हटले आहे. 


आयपीएल मध्ये हार्दिकची कामगिरी

हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९२ सामने खेळले आहेत. त्यात पाड्यांने २७.३३ च्या सरासरीने १५९.९१ ची स्ट्राईक रेटने १४७६ धावा काढल्या आहेत. आयपीएलमध्ये हार्दिकने चार वेळा अर्धशतक ठोकले आहेत. पांड्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक ९१ रन्स बनवले आहेत. गोलंदाजीमध्ये पांड्याने ३१.२६ च्या सरासरीने ९.०६ च्या इकॉनमी रेटने ४२ विकेट्स घेतले आहेत. 

म्हणून मुंबई इंडियन्समध्ये पांड्याचा समावेश नाही

२०२१ मध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी चांगली नव्हती. त्यामुळे पांड्याला मुंबई इंडियन्समध्ये घेण्यात आले नाही असे सांगण्यात येत आहे. तसेच फिटनेसच्या तक्रारीमुळे हार्दिक सध्या बॉलिंगही करू शकत नाही. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी