जखमी शिखर धवनची जागा घेणार कोण? 

Shikhar Dhawan, ICC cricket world cup 2019: भारताचा सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे तीन आठवड्यांसाठी वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी कोणाला घेणार हा मोठा प्रश्न आहे.

shikhar dhawan
शिखर धवन  |  फोटो सौजन्य: AP

लंडन :  आयसीसी वर्ल्ड कप २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात दुखापतग्रस्त झालेला भारताला सलामीवीर फलंदाज शिखर धवन आगामी ३ आठवड्यापर्यंत वर्ल्ड कपच्या सामन्यांपासून दूर राहणार आहे. पण आता त्याला आरामासाठी भारतात पाठविण्यात येणार की त्याला संघासोबतच ठेऊन ३ आठवड्यानंतर पुन्हा संघात स्थान देण्यात येईल हे अद्याप बीसीसीआयकडून निश्चित करण्यात आलेले नाही. शिखर धवन यांच्या डाव्या अंगठ्याला नाथन कुल्टन नाइलचा चेंडू लागल्याने फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. 

रायडू-पंतला संधी

शिखर धवन याला मायदेशी पाठवण्यात आले तर त्याच्या जागी संघात स्टँडबाय खेळाडूंपैकी कोणाची वर्णी लागू शकते आता हा प्रश्न क्रिकेट रसिकांच्या मनात घोंघावत आहे. रिझर्व खेळाडू म्हणून अंबाती रायडू आणि रिषभ पंत यांचे नाव आहे. त्यामुळे या पैकी एकाला संधी देण्यात येऊ शकते.  या परिस्थितीत अंबाती रायडूला लॉटरी लागण्याची शक्यता जास्त दिसते आहे. शिखर धवन यांच्या अनुपस्थितीत भारताने पर्यायी सलामीवीर म्हणून के. एल. राहुलला इंग्लंडला नेले होते. पण भारताला चौथ्या क्रमांकाची समस्या जास्त भेडसावत असल्याने त्याला चौथ्या क्रमांकावर खेळविण्यात आले. त्याने सराव सामन्यात स्वतःला सिद्धही केले. त्यामुळे आता के. एल. राहुल सलामीला खेळायला गेल्यावर त्याच्या जागी बाहेरून संघात घ्यायचे झाल्यास बीसीसीआयने अंबाती रायडू याला संधी मिळू शकते. यापूर्वी त्याने चौथ्या क्रमांकावर खेळून चांगली कामगिरी केली होती. तो संघात असताना भारताने ५० पैकी ३५ सामने जिंकले होते. त्यामुळे त्याच्यावर बीसीसीआय भरवसा ठेवू शकते. 

रिषभ पंत या संधी कमी वाटते आहे. संघात विकेटकीपर फलंदाज म्हणून यापूर्वीच महेंद्रसिंग धोनी आणि दिनेश कार्तिक आहेत. अशा वेळी बेंचवर दिनेश कार्तिक असताना रिषभ पंतचा क्रमांक लागणे जरा अवघड वाटते.  

जडेजा,शंकर, कार्तिकपैकी कोण? 

शिखर धवन जर संघासोबत राहूनच ३ आठवड्यानंतर खेळला तर त्या परिस्थितीत आगामी तीन आठवड्यांसाठी १५ सदस्यीय भारतीय संघातील तीन जणांची  अंतीम ११ मध्ये वर्षी लागू शकते. यात पहिल्या क्रमांकावर विजय शंकर याला संधी मिळू शकते. विजय शंकर हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्यामुळे इंग्लिश कंडिशनमध्ये तो फलंदाजी आणि गोलंदाजीही चांगली करू शकतो त्यामुळे टीम इंडियाला त्याचे संघात असणे फायदेशीर ठरणार आहे. भारतीय कर्णधाराने आणखी एक स्पीनर आणि फलंदाज पर्याय निवडला तर अशा परिस्थितीत रविंद्र जडेजा याची वर्णी लागू शकते. जडेजा आपल्या लेफ्ट आर्म गोलंदाजींनी प्रभावी ठरतो. तसेच न्यूझीलंड विरूद्धच्या सराव सामन्यात तो एकटाच अर्धशतक झळकावणारा फलंदाज होता. तसेच त्याचे क्षेत्ररक्षणही १० ते १२ धावा वाचविण्यात मदत करते. त्यामुळे त्यालाही न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात संधी मिळू शकते. 

दिनेश कार्तिकचा विचार सर्वात शेवटी केला जाऊ शकतो. कारण केवळ फलंदाजाला फलंदाज असा पर्याय कोहलीला निवडायचा असल्यास तो चौथ्या क्रमांकासाठी दिनेश कार्तिकाचा पर्याय निवडू शकतो. त्यामुळे बीसीसीआय जो पर्यंत शिखर धवनबाबत आपली भूमिका स्पष्ट करत नाही, ते पर्यंत चाहत्यांना हे प्रश्न भेडसावत राहतील. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
जखमी शिखर धवनची जागा घेणार कोण?  Description: Shikhar Dhawan, ICC cricket world cup 2019: भारताचा सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे तीन आठवड्यांसाठी वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी कोणाला घेणार हा मोठा प्रश्न आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola