Ricky Pointing: द्रविड टीम इंडियाचा हेड कोच बनल्यानंतर पाँटिंगने व्यक्त केले आश्चर्य, सोबत केला मोठा खुलासा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 19, 2021 | 15:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ricky pointing: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. सोबतच त्याने मोठा खुलासाही केला. 

ricky pointing
द्रविड टीम इंडियाचा हेड कोच झाल्यावर पाँटिंगचा मोठा खुलासा 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केले आश्चर्य
  • पाँटिगने असाही खुलासा केला की त्याच्यासमोरही होता हा प्र्स्ताव
  • पाँटिंगने या कारणाने दिला होता नकार

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविड(rahul dravid) आता नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. भारतीय टी-२० संघाने(team india t-20) नवा कर्णधार आणि नव्या प्रशिक्षकासह विजयी सलामी दिली. पहिल्याच सामन्यात त्यांनी न्यूझीलंडवर(new zealand) ५ विकेटनी विजय मिळवला. विजयासाठी मिळालेल्या १६५ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने २ बॉल आणि ५ विकेट राखत पूर्ण केले. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पाँटिंगने राहुल द्रविड टीम इंडियाचा हेड कोच(head coach) होण्यासाठी तयार झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. पाँटिंग म्हणाला, त्यांची मुले अजून खूप लहान आहेत अशातच त्यांनी हेड कोच होण्यासाठी तयार होण्याचा निर्णय आश्चर्यजनक आहे. Ricky pointing is surprised with team India head coach Rahul Dravid

द्रविड हेड कोच बनल्याने हैराण

पाँटिंगने एका पॉडकास्टदरम्यान सांगितले, खरंतर मी द्रविड टीम इंडियाचा हेड कोच होण्यासाठी तयार झाला हे ऐकूनच हैराण आहे. तो अंडर १९ क्रिकेट संघाचा कोच म्हणून काम करताना खूप खुश होता आणि याबाबत खूप चर्चाही झाली होती. मला त्यांच्याबद्दल कौंटुबिक माहिती नाही. मात्र त्यांची मुले अजून लहान आहेत. त्यामुळे मला आश्चर्य वाटले की त्यांनी हेड कोच बनण्यास होकार कसा दिला. 

पाँटिंगकडे आला होता हेड कोच बनण्यासाठीचा प्रस्ताव

पाँटिंगने या दरम्यान हा खुलासाही केला की त्याच्यासमोरही हेड कोच बनण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र त्याने यास नकार दिला. पाँटिंग याबाबत म्हणाला, माझी आयपीएलदरम्यान याबाबत काही लोकांशी बातचीत झाली होती. ज्यांच्याशी माझी बातचीत झाली होती त्यांना वाटत होते की मी कोणत्याही प्रकारे तयार व्हावे. प्रस्ताव समोर आल्यानंतर पहिली गोष्ट मी त्यांना सांगितली होती की मी इतका वेळ देऊ शकणार नाही आणि आयपीएलमध्येही मी कोच म्हणून काम करू शकणार नाही. 

राहुल द्रविड ४८ वर्षांचा आहे. तो सध्या बंगळुरू येथे बीसीसीआयने स्थापन केलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा मुख्य प्रशिक्षक आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्यात त्याने टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून काम केले होते. द्रविड सध्या १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघ यांनाही प्रशिक्षण देत आहे. याआधी द्रविडने २०१६ आणि २०१७ मध्ये बीसीसीआयकडून संधी मिळत असूनही टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी नाकारली होती. तरुण क्रिकेटपटूंना शिकवणे आवडते, असे कारण देत त्याने क्रिकेट अकादमीच्या कामात स्वतःला गुंतवले होते. पण यावेळी त्याने भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याचा निर्णय घेतला आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी