ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पाँटिंग हॉस्पिटलमध्ये

ricky ponting admit in hospital after suffering heart complications during the australia and west indies test commentary : ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पाँटिंग याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ricky ponting admit in hospital
ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पाँटिंग हॉस्पिटलमध्ये  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पाँटिंग हॉस्पिटलमध्ये
  • लाइव्ह कॉमेंट्री करत असताना रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली
  • मीडियाच्या रिपोर्टनुसार रिकी पाँटिंगला हार्ट अॅटॅक आला

ricky ponting admit in hospital after suffering heart complications during the australia and west indies test commentary : ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पाँटिंग याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टेस्ट मॅचसाठी लाइव्ह कॉमेंट्री करत असताना रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली. यानंतर पाँटिंगला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

सध्या वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिज आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात 2 टेस्ट मॅचच्या सीरिजची पहिली मॅच 30 नोव्हेंबर 2022 पासून सुरू आहे. या मॅचच्या तिसऱ्या दिवशी 2 डिसेंबर 2022 रोजी कॉमेंट्री करत असताना रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

रिकी पाँटिंग याच महिन्यात 19 डिसेंबर 2022 रोजी वयाची 48 वर्षे पूर्ण करणार आहे. वाढदिवसाला 3 आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरला असताना पाँटिंगला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक वृत्तानुसार कॉमेंट्री करत असताना रिकी पाँटिंगला अस्वस्थ वाटू लागले. छातीत वेदना होऊ लागल्या. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार रिकी पाँटिंगला हार्ट अॅटॅक आला. यानंतर त्याला वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने पर्थ येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्यामुळे रिकी पाँटिंग टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी लंचनंतर कॉमेंट्री करण्यासाठी आलेला नाही. 'डेली टेलीग्राफ'च्या वृत्तानुसार रिकी पाँटिंगवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर आहे.

रिकी पाँटिंग 'चॅनल 7'साठी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टेस्ट सीरिजसाठी कॉमेंट्री करत होता. चॅनलच्या प्रवक्त्याने पाँटिंग आजारी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पाँटिंग पुन्हा कॉमेंट्रीसाठी कधी येणार आहे हे आताच सांगता येणार नाही, असेही प्रवक्त्याने सांगितले. 

रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमने 2003 आणि 2007 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला आहे. पाँटिंगने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. तो ऑस्ट्रेलियासाठी 168 टेस्ट, 375 वन डे, 17 टी 20 इंटरनॅशनल मॅच खेळला. त्याने टेस्टमध्ये 13 हजार 378 धावा केल्या. वन डे मध्ये त्याने 13 हजार 704 धावा केल्या. टी 20 मध्ये त्याने 401 धावा केल्या. पाँटिंगने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वन डे आणि टेस्ट मिळून 71 शतके केली. एवढीच शतके विराट कोहलीने पण केली आहेत. पाँटिंग आणि कोहली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वन डे आणि टेस्ट मिळून सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. या यादीत 100 शतकांसह सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी