Shubman Gill - Sara Tendulkar यांचा ब्रेकअप झालाय काय ?, दोघांनी एकमेकांना केले अनफॉलो

झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेच्या शेवटच्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर गिल प्रसिद्धीच्या झोतात आला आणि सचिनची मुलगी सारा हिच्यासोबतच्या त्याच्या अफेअरचे किस्से पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले. युजर्सनी दोघांबद्दल अनेक प्रकारचे मीम्स बनवले.

Rift in Shubman and Sara's friendship? unfollow each other on instagram
Shubman Gill - Sara Tendulkar ने केले एकमेकांना अनफॉलो, ब्रेकअप झालाय काय ?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शुभमन गिलने सचिन तेंडुलकरचा 24 वर्ष जुना विक्रमही मोडला.
  • सोशल मिडियावर गिल आणि सारा तेंडूलकरच्या अफेअरची चर्चा
  • दोघांनी एकमेकांना केल अनफाॅलो

मुंबई: टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याने कारकिर्दीतील पहिले एकदिवसीय शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. या कामगिरीनंतर शुबमन गिल आणि सचिनची मुलगी सारा तेंडुलकरचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. (Rift in Shubman and Sara's friendship? unfollow each other on instagram)

अधिक वाचा : ICC ODI Rankings: शुभमन गिलचा जलवा, वनडे रँकिंगमध्ये मिळवले हे स्थान

सोशल मीडिया यूजर्सनी वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवायला सुरुवात केली आणि दोघांच्या अफेअरच्या वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. दरम्यान, हे पाहिले असता सारा तेंडुलकर आणि शुभमन यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे दिसून आले. मात्र साराने शुबमनची बहीण शहनील गिलला नक्कीच फॉलो केले आहे. अशा परिस्थितीत दोघांचे ब्रेकअप झाले की काय अशी चर्चा होत आहे. 

अधिक वाचा : Asia Cup 2022: भारताचे किती सामने, पाकिस्तानविरुद्ध रंगणार ३ सामने? जाणून घ्या आशिया कपशी संबंधित सर्व उत्तरे

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र आतापर्यंत त्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांनीही याबाबत कधीही कोणतेही वक्तव्य किंवा भाष्य केलेले नाही. 2019 च्या आयपीएलमध्ये दोघांचीही पहिल्यांदा दखल घेण्यात आली होती.


शुभमन गिल आयपीएल 2019 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) खेळला. या हंगामानंतर गिलने 'रेंज रोव्हर' कार खरेदी केली. त्यानंतर त्याने नवीन कारसोबतचे त्याचे काही फोटो शेअर केले. त्यावर सारानेही कमेंट केली होती. राने हार्ट इमोजी बनवताना कमेंटमध्ये लिहिले, 'अभिनंदन.' त्याच्या प्रत्युत्तरात गिलने हार्ट इमोजीही बनवला आणि लिहिले, 'सारा तेंडुलकरचे खूप खूप आभार.' इथूनच सारा आणि गिलच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी