मुंबई: जर तुम्हाला सांगितले की क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या गोलंदाजाच्या नावावर एका चेंडत १७ धावा दिल्याचा लाजिरवाणा रेकॉर्ड आहे तर तुमचा विश्वास बसणे थोडे कठीण होईल. मात्र तुम्हाला हेही सांगितले की याच गोलंदाजाला आयपीएलमध्ये(Indian Premier League) तब्बल ८ कोटी रूपयांना विकत घेतले गेले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
हा क्रिकेटर आहे ऑस्ट्रेलियाचा राईली मेरेडिथ(Riley Meredith) . लिलावात या क्रिकेटरला किंग्स इलेव्हन पंजाबने(Punjab Kings). तब्बल ८ कोटी रूपयांना विकत घेतले. तस्मानियाचा मेरेडिथ बिग बॅश लीगमध्ये आपल्या कामगिरीमुळे नेहमी चर्चेत राहिला आहे. मात्र त्याच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्डचीही नोंद आहे.
बिग बॅश लीगमध्ये राईली मेरेडिथने एका बॉलवर तब्बल १७ धावा दिल्या. त्याच्या नावावर हा लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदला गेला. हा सामना मेलबर्न रेनेगेड्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात खेळवण्यात आला होता. १८४ धावा केल्यानंतर हरिकेन्सने पहिली ओव्हर राईलीला दिली. त्याने या ओव्हरमध्ये २३ धावा दिल्या. कमालीची बाब म्हणजे त्याने १७ धावा केवळ एका चेंडूत दिल्या.
राईलीचा पहिला बॉल नो बॉल ठरला. दुसऱ्या बॉलवर वाईडसाठी पाच धावा मिळाल्या. त्यानंतर तिसऱ्या फुलटॉस नो बॉलवर फलंदाजाने चौकार ठोकला. पुढील चेंडू त्याने पुन्हा नो बॉल ठरला. यावर फलंदाजाने चौकार लगावला. पुढील बॉलवर त्याने पुन्हा सिंगल धाव दिली. अशा पद्धतीने त्याने एका बॉलवर १७ धावा केल्या.
२४ वर्षीय वेगवान गोलंदाज राईली मेरेडिथची बेस प्राईज केवळ ४० लाख होती. त्याने ३४ टी-२० सामन्यांमध्ये ४३ विकेट मिळवल्या होत्या. शेन वॉर्नसह अनेक माजी क्रिकेटर्स याला ऑस्ट्रेलियाचा स्टार म्हणत आहेत. आता हे पाहावे लागेल की पंजाब किंग्सकडून खेळत मेरेडिथ आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो. मेरेडिथने २०१७मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेलताना क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनमध्ये खेळताना आपले पदार्पण केले होते. २०१८-१९मध्ये त्याने शेफील्ड शील्डच्या ८ सामन्यांमध्ये २७ विकेट घेतल्या होत्या. तर त्याने होबार्ट हरिकेन्ससाठी बिग बॅश लीगमध्ये १६ विकेट मिळवल्या होत्या.