रिषभ पंतचे मुंबईत होणार ऑपरेशन, एअरअँब्युलन्सने केले शिफ्ट

Rishabh Pant airlifted to Mumbai, set to undergo surgery: BCCI : भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमधून मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले.

Rishabh Pant airlifted to Mumbai, set to undergo surgery: BCCI
रिषभ पंतचे मुंबईत होणार ऑपरेशन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • रिषभ पंतचे मुंबईत होणार ऑपरेशन
  • एअरअँब्युलन्सने केले शिफ्ट
  • अंबानी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले

Rishabh Pant airlifted to Mumbai, set to undergo surgery: BCCI : भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमधून मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. डेहराडून येथून रिषभ पंतला एअरअँब्युलन्सने मुंबईला शिफ्ट करण्यात आले. 

विकेटकीपर बॅटर रिषभ पंतच्या कारला 30 डिसेंबर 2022 रोजी उत्तराखंडमध्ये अपघात झाला. या अपघातात पंतच्या लिगामेंटला दुखापत झाली. लिंगामेंटच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी पंतवर मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये एक ऑपरेशन करण्यात येणार आहे. हे ऑपरेशन ऑर्थोपेडिक सर्जन दिनशॉ परदीवाला (Dr. Dinshaw Pardiwala) यांच्या नेतृत्वात केले जाईल. खेळाडूंवर उपचार करण्यासाठी सर्जन दिनशॉ परदीवाला प्रसिद्ध आहेत. 

उत्तराखंडमध्ये अपघात झाला त्यावेळी कारला आग लागली होती. रिषभ पंत कारमधून बाहेर आला त्यामुळे वाचला होता. अपघातात रिषभच्या पाठीला तसेच गुडघा, टाच आणि लिगामेंटला दुखापत झाली होती. अनेक दुखापती किरकोळ स्वरुपाच्या आहेत. पण या दुखापतींमुळे रिषभ पंतच्या हालचालींवर मर्यादा आली आहे. लिगामेंटच्या दुखापतीचे स्वरुप थोडे गंभीर आहे. यामुळे बीसीसीआयने रिषभ पंतवर मुंबईत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

रिषभ पंत भारतीय क्रिकेटपटू आहे. पंतच्या क्रीडापटू म्हणून सुरू असलेल्या कामगिरीवर परिणाम करणारी दुखापत झाल्यास त्यावर उपचार करण्याचा विशेषाधिकार बीसीसीआयकडे आहे. या अधिकाराचा वापर करत बीसीसीआयने रिषभ पंतला मुंबईत आणले आहे. उपचारांनंतर प्रकृती स्थिर झाली की, रिषभ पंतला बीसीसीआयच्या रिहॅब सेंटरमध्ये पाठवले जाईल. पण दुखापतीमुळे रिषभ पंत ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सीरिज आणि आयपीएल 2023 खेळणार नाही.

Paush Purnima : कधी आहे नव्या वर्षातील पहिली पौर्णिमा? जाणून घ्या पौर्णिमेचे व्रत आणि उपाय

January 2023 : जानेवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी