Rishabh Pant car accident live video: क्रिकेटर रिषभ पंत याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी (30 डिसेंबर 2022) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात रिषभ पंत याच्या पायाला, डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. रिषभ पंतच्या कारचा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अपघाताचा व्हिडिओ पाहून हा अपघात किती गंभीर होता याचा अंदाज वर्तवता येऊ शकतो. (Rishabh pant car accident shocking incident caught in cctv watch live video delhi dehradun highway)
अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला असून त्यात दिसत आहे की, भरधाव कार डिव्हायडरवर जोरात आदळली आणि पलटली. या अपघातानंतर रिषभ पंतच्या कारने पेट घेतला. पेटत्या कारचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.
TIMES NOW accesses CCTV footage of Rishabh Pant's accident. — TIMES NOW (@TimesNow) December 30, 2022
The accident occurred at around 5:21 am today. He was immediately taken to AIIMS Rishikesh where his condition got stable. He will now be shifted to a multi-speciality hospital.@priyanktripathi shares more details. pic.twitter.com/KnoYou34I6
भीषण अपघातानंतर रिषभ पंत याची गाडी जळत होती तर त्याचवेळी दुसऱ्या लेनमधून अनेक वाहने जात होती. याच दरम्यान एका व्यक्तीने तेथील व्हिडिओ शूट केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड केला.
हे पण वाचा : मृत्यूपूर्वी मिळतात हे 5 संकेत
ऋषभ पंत की कार एक्सीडेंट का सीसीटीवी फुटेज आया सामने @NavbharatTimes pic.twitter.com/55t1wcmJQa — NBT Uttar Pradesh (@UPNBT) December 30, 2022
या अपघातात रिषभ पंत याच्या पाठीला, डोक्याला दुखापत झाली आहे. रिषभ पंतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देहरादून येथील मॅक्स रुग्णालयात रिषभ पंत याच्यावर उपचार सुरू आहेत.
हे पण वाचा : नवीन वर्ष 2023 च्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, क्रिकेटर ऋषभ पंत याच्या गाडीला शुक्रवारी (30 डिसेंबर 2022) पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. भरधाव कारने थेट डिवायडरला धडक दिली आणि त्यानंतर गाडी उलटली. गाडी इतकी वेगात होती की काही फूट अंतरावर गेल्यावर गाडी थांबली आणि नंतर पेट घेतला.