IND Vs Eng: Rishabh Pantने इंग्लंडच्या या गोलंदाजाकडून एकाच ओव्हरमध्ये घेतला संपूर्ण मालिकेचा बदला

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 18, 2022 | 12:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs ENG 3rd ODI:ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात तुफानी शतक ठोकले. त्याने इंग्लंडचा गोलंदाज डेविड विलीच्या एका ओव्हरमध्ये सलग ५ बॉलमध्ये ५ चौकार ठोकले. 

rish
Pantने इंग्लंडच्या या गोलंदाजाकडून घेतला मालिकेचा बदला 
थोडं पण कामाचं
  • इंग्लंडकडून ४२वी ओव्हर डेविड विलीने टाकली.
  • या ओव्हरमध्ये ऋषभ पंत क्रीजवर होता आणि आक्रमक बॅटिंग करत होता.
  • ओव्हरमध्ये पंतने विलीला सलग ५ चौकार ठोकले.

मुंबई: भारतीय टीम (Team India)ने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत जबरदस्त २-१ असा विजय मिळवला. टीम इंडियाकडून ऋषभ पंतने(rishabh pant) कमालीचा खेळ केला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात पंत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता आणि त्याला कोणतीच कमाल करता आली नव्हती. मात्र त्याची सारी कसर त्याने तिसऱ्या सामन्यात भरून काढली. पंतने तिसऱ्या सामन्यात तुफानी शतक ठोकले. त्याने इंग्लंडला गोलंदाज डेविड विलीच्या ओव्हरमध्ये जबरदस्त खेळी केली. rishabh pant hits 5 fours in one over of david willey

अधिक वाचा - मांजरांच्या पिल्लांना लागले मोबाईलचे व्यसन

इंग्लंडविरुद्ध केली कमाल

इंग्लंडकडून ४२वी ओव्हर डेविड विलीने टाकली. या ओव्हरमध्ये ऋषभ पंत क्रीजवर होता आणि आक्रमक बॅटिंग करत होता. या ओव्हरमध्ये पंतने विलीला सलग ५ चौकार ठोकले. त्याने मैदानाच्या प्रत्येक दिशेला स्ट्रोक लावले. पंतची ही खेळी पाहून प्रेक्षकही हैराण झाले. डेविड विलीच्या या ओव्हरमध्ये पंतने २१ धावा केल्या. सगळ्यांना वाटत होते की पंत या ओव्हरमध्येच मॅच संपवेल. मात्र शेवटच्या बॉलवर त्याने केवळ एक धाव काढली. डेविड विलीवर चौकार ठोकताना पंतला हसू येत होते. 

पंतचे तुफानी शतक

वनडे क्रिकेटमध्ये ऋषभ पंतचे हे पहिले शतक आहे. त्याने ११३ चेंडूत १२५ धावा केल्या. यात त्याने १६ चौकार आणि २ षटकार मारले. ज्यो रूटच्या बॉलवर ४३व्या ओव्हरमध्ये रिव्हर्स स्वीपवर चौकार ठोकत त्याने भारताला विजय मिळवून दिला. गेल्या काही वर्षात ऋषभ पंतने आपल्या फलंदाजीच्या जोरावर कमाल केली आहे. 

अधिक वाचा - भारतीय हद्दीत पुन्हा पाकिस्तानी ड्रोन

टीम इंडियाने जिंकली मालिका

भारताने इंग्लंडविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. भारताच्या गोलंदाजी आणि फलंदाजांनी कमाल केली. हार्दिक पांड्याने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या सामन्यात ७१ धावा केल्या. त्यासोबतच त्याने चार विकेटही घेतल्या. त्याआधी युझवेंद्र चहलनेही आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी